शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे दीडशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:43 PM

जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत १५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आॅगस्ट महिन्याच्या १२ दिवसातच ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४८५० इतकी झाली आहे. तर ३३०९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. १० एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. साक्री येथील ५३ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तसेच एप्रिल महिन्यातच धुळे शहरातील मछीबाजार व तिरंगा चौक परिसरातील लोकप्रतिनिधीच्या भावाचा मृत्यू झाला होता.धुळे शहरातील ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित जिल्ह्यातील ७४ रुग्ण दगावले आहेत. त्यात शिरपूर तालुक्यातील ३० रुग्णांचा समावेश आहे.१ ते ७ आॅगस्ट दरम्यान ३२ रुग्ण दगावले... १ ते ७ आॅगस्ट दरम्यान सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सात दिवसांच्या कालावधीत तब्बल ३२ रुग्ण दगावले आहेत. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा कहर अधिकच तीव्र झाला आहे. एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण आॅगस्ट महिन्यात आढळले आहेत. ८ आॅगस्ट रोजी १६८ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण ११ आॅगस्ट रोजी आढळले. ११ रोजी तब्बल २२९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर १२ आॅगस्ट रोजी १६४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान १२ ते १८ जून या कालावधीत देखील १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता.