धुळे : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बसमधून महिलेची रोख रकमेसह दागिने ठेवलेली बॅग अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली आह़े ही घटना रविवारी सकाळी घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े प्रतिभा किशोर पाटील (रा़ धाकपाडे निवास, बसस्थानकाजवळ जवळ, साकूर जि़ लातूर) या 16 एप्रिल रोजी सकाळी बसने अमळनेर येथे जात होत्या़ सकाळी दहा वाजता बस धुळे बसस्थानकात थांबली होती़ त्यादरम्यान अज्ञात चोरटय़ांनी त्यांची बॅग व त्यातील 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख 15 हजार रुपये चोरून नेल़े बॅग चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रतिभा पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली़ त्यावरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही़ डी़ गुरव करीत आहेत़ट्रकचालकाचा खिसा कापून रोख रकमेसह मोबाइल लंपासशिंदखेडा तालुक्यातील वाघाडी गाव शिवारातील कर्मवीर पेट्रोल पंपाच्या आवारात ट्रक उभी करून ट्रकचालक सियाराम यादव (रा़ साताकेन चौराह, प्लॉट न 38, करेरा जि़ शिवपुरी, मध्य प्रदेश) हा ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेला असताना अज्ञात चोरटय़ाने त्याचा खिसा कापला़ खिशातील रोख 14 हजार 950 रुपये व दोन मोबाइल असा एकूण 20 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ ही घटना 16 एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली़ याबाबत ट्रकचालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ाविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ ठाकरे करीत आहेत़ शेतक:याच्या मोबाइलसह रोकड लंपासनरडाणा ते बेटावद रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खालून शेतकरी प्रफुल्ल मधुकर सिसोदे (रा़ नरडाणा ता़ शिंदखेडा) यांचा 4 हजार रुपये किमतीचा मोबाइल व 6 हजार रुपये रोख एकाने चोरून नेल़े, तसेच त्यांची विल्हेवाट लावली़ 16 एप्रिल रोजी दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान ही घटना घडली़ याप्रकरणी प्रफुल्ल सिसोदे यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शेख अकील शेख अजगर (रा़ सुप्रीम कॉलनी, मुंबई बेकरीजवळ, जळगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ पी़ डी़ माळी करीत आहेत़
दीडलाखाचे सोने लंपास
By admin | Published: April 18, 2017 12:11 AM