धुळे : शहरातील स्वामिनारायण मंदिर ट्रस्टच्या रस्त्याची मागील भिंत बुधवारी रात्री जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली़ ती नेमकी कुणी पाडली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही परंतु या घटनेवेळी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत ट्रस्टच्या पदाधिका:यांशी चर्चा सुरू होती. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या कारवाईविरोधात भक्तांचे आंदोलन सुरू असतानाच सर्वाना गाफील ठेवून मागील भिंत जेसीबीने पाडण्यात आली़ पोलीस त्या ठिकाणी पोहचेर्पयत चालक जेसीबी घेऊन तेथून पसार झाला होता. स्वामिनारायण ट्रस्टचे प्रवेशद्वार काढले जाणार असल्याचा संदेश आमदार अनिल गोटे यांच्या कार्यकत्र्याकडून बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता़ त्यानुसार सायंकाळी पाच वाजता आमदार अनिल गोटे यांच्यासह लोकसंग्रामचे पदाधिकारी मंदिरात दाखल झाल़े स्वामिनारायण ट्रस्टचे प्रमुख आनंदस्वामी महाराज, भावनिक भक्त अॅड़ जी़व्ही़गुजराथी यांच्याशी आमदार गोटे यांनी चर्चा करीत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली़ तर ट्रस्टने मात्र सदरची जागा स्वामिनारायण ट्रस्टची असल्याचा दावा केला़ मनपाच्या काही कर्मचा:यांनी नकाशेसुद्धा दाखविले. बुधवार संध्याकाळच्या या कारवाईत महापालिकेची कोणतीही भूमिका नसली तरी यापूर्वी हा रस्ता मोकळा करण्यासंदर्भात महापालिकेतर्फे ट्रस्टला नोटीस देण्यात आलेली होती. यावेळी मंदिर परिसरात भक्तांची गर्दी झाली होती़ स्वामिनारायण मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर जेसीबी आणण्यात आल्याने महिलांनी तेथेच ठिय्या देत भजन सुरू केल़े मात्र मुख्य प्रवेशद्वारावर महिलांचे आंदोलन सुरू असतानाच जेसीबीने काही क्षणात ट्रस्टच्या रस्त्यावरील भिंत जमीनदोस्त केली़ यावेळी त्या ठिकाणी लोकसंग्रामचे कार्यकर्ते उपस्थित होत़े लोकसंग्रामचा विजय असो, अशा घोषणा कार्यकत्र्यानी दिल्या व आमदार गोटे यांनी काढता पाय घेतला़ रात्री उशिरार्पयत महिलांचे आंदोलन अॅड़ जी़व्ही़ गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत़े चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता़
‘स्वामिनारायण’च्या भिंंतीवर हातोडा!
By admin | Published: February 16, 2017 12:23 AM