शिंदखेडा : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद यांच्या संयुक्तपणे मंगळवार ३ रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत दिव्यांग मुलांच्या पालकांचे प्रशिक्षण गटशिक्षणधिकारी एफ.के. गायकवाड यांच्या मार्गदर्शननुसार गटसाधन केंद्र्र येथे आज घेण्यात आले.प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांच्या हस्ते हेलेन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमांच्या पूजनाने करण्यात आले. या वेळी व्यासपीठवर गटविकासअधिकारी सुरेश शिवदे, सहायक गटविकास अधिकारी योगेश गिरासे, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक सोनवणे, बी.बी. भिल, अशोक पवार, केंद्र्र प्रमुख जगदीश पाटील, सचिन पिंगळे, भिमराव देवरे, हेमकांत अहिरराव उपस्थित होते. यानिमित दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनवही व खाऊ वाटप करण्यात आले.या वेळी प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दिव्यांग मुलांच्या बाबतीत आपल्या मनात असलेली भिती दूर करा. त्यांच्याशी एकरूप व्हा. दिव्यांग मूल शिकु शकते ते शाळेत जाउ शकते. तसेच त्यांच्यासाठी जे शिबिर आयोजित होते त्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पालकांनी मुलांना घेऊन येणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे दिव्यांग मुलांच्या समावेशनाबाबत मार्गदर्शन केले. पालकांच्या अपेक्षा काय आहेत, दिव्यांग मुलांच्या अडीअडचणी, विविध शैक्षणिक सुविधा या विषयी सविस्तर माहिती दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कामेश राजपूत, डॉ.उज्वल पाटील, विषयसाधन व्यक्ती अनिल चव्हाण, विषयतज्ज्ञ ऋषिकेश वाघ, ललीत भामरे, विशेष शिक्षक अनिल पाटील, हिरालाल चव्हाण यांनीही विविध विषयावर पालकांना मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन व आभार अनिल चव्हाण यांनी मानले. तर समावेशित शिक्षण विभाग व सर्व विषयसाधन व्यक्ती व सर्व गटसाधन केंद्रातील कर्मचारी यांनी पालक प्रशिक्षण यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
शिंदखेडा येथे दिव्यांग पालक प्रशिक्षणवर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 10:50 PM