ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.1- एसआरपीएफ जनावांना सकाळी साडेआठ वाजता अचानक बंदोबस्तासाठी बोलाविल़े जवान वाहनात बसले आणि वाहने थेट सिनेमागृहासमोर थांबली़ जवानांना सचिनच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात आला़ याबाबत जवानांना काहीही माहीत नसल्याचे त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या उपक्रमाने जवान आनंदी आणि खूश झाल़े
राज्य राखीव पोलीस बलात नव्याने समादेशक म्हणून आलेल्या चंद्रकांत गवळी यांनी पहिल्यांदाच हा उप्रकम राबविला़ राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचारी नेहमी बंदोबस्तासाठी तैनात असतात़ त्यामुळे कुटूंबासाठीही वेळ देऊ शकत नाही़ त्यामुळे ताणतणाव त्यातून नैराश्य येत़े ही बाब लक्षात घेऊन चंद्रकांत गवळी यांनी बुधवारी सकाळी नकाणे रोडवरील एसआरपी कॅम्पमध्ये जवानांना अचानक बंदोबस्ताला जाण्यासाठी बोलविल़े त्यामुळे अधिकारी व कर्मचारी हजर झाल़े त्यांना गाडीत बसवून मनोहर चित्रमंदिरासमोर आणल़े मात्र परिसरातही शांतता होती़ त्यामुळे आपल्याला येथे नेमके कशासाठी आणले, असा प्रश्न प्रत्येकाला पडल होता़ त्यानंतर सर्वाना चित्रपटगृहात नेऊन प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारीत प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यासाठी आपल्याला आणण्यात आल्याच चंद्रकांत गवळी यांनी सांगितल़े त्यानंतर सर्वांना सिनेमा दाखविण्यात आला़ त्यामुळे अधिकारी व कर्मचा:यांनीही आनंद व्यक्त केला़