शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

दोंडाईच्यात पुन्हा आरोग्य सर्वेक्षण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:55 AM

मुख्याधिकाऱ्यांचा इशारा : लक्षणे दिसत असूनही स्वॅब न देणाऱ्यांविरोधात होणार आता कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईच्यात कोरोना संसर्ग वाढत असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोंडाईचा नगरपालिका व महसूल प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी पुन्हा आरोग्य सर्व्हेक्षण होत आहे. कोरोना सदृश्य, गंभीर लक्षणे असणाºयांची नोंद होत आहे. काही गंभीर लक्षणे दिसत असतील तर तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वॅब देणे बंधनकारक आहे. परंतू लक्षणे दिसत असूनही स्यब देण्यास टाळटाळ केली तर त्याविरोधात संसर्ग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी दिला आहे.वाढत्या रुग्ण संख्येने नागरिकांसह प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही अनेक नागरिक विना मास्क, विना फिजिकल डिस्टन्सिंग वावरत आहेत. या बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना साखळी तुटत नाही. बरेच दुकानदार ग्राहकाला सॅनिटाईज न करता प्रवेश देताना दिसतात. ग्रामीण भागातील जनता बाजार व इतर कामांसाठी घोळक्याने येतात. त्यातील बरेच जण मास्क लावत नाहीत. अवैध प्रवासी वाहनांवर येतांना लगतच बसलेले असतात. त्यामुळे सुद्धा कोरोनास आमंत्रण मिळू शकते. दोंडाईचात विविध कारणाने कोरोनाने बस्तान बसविले दिसत आहे.दोंडाईचात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मंगळवारी म्हणजे १९ रुग्ण आढळले. ९८ रुग्णांवर उपचार सुरू असून १३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारपर्यंत दोंडाईचा शहरात २३३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा नगरपालिका व महसूल प्रशासन पुन्हा जोरात कामाला लागले आहे.यासाठी मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेचे २४ कर्मचारी ६ टीममध्ये काम करीत आहेत. ४० वर्ष वयोगटातील लोकांचा सर्व्हे करून त्यात श्वसनाचे, हृदयाचे व इतर काही गंभीर आजार असतील तर त्याची नोद करीत आहेत. कोरोनासदृश्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत असतील, त्यास उपजिल्हा रुग्णलयात स्वॅब घेण्यासाठी पाठविले जाते. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी आरोग्य सर्व्हेक्षण महत्वाचे आहे. कोरोनाची इतरांना लागण होऊ नये म्हणून गंभीर लक्षणे दिसत असणाºयांनी तात्काळ स्वॅब देणे बंधनकारक आहे. स्वॅब न देणारे, टाळाटाळ करणाºयांविरोधात संसर्ग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकाºयांनी दिला आहे.शहरात ३० कंटेन्मेंट झोन असून त्या ठिकाणी फवारणी सुरू आहे. बाधित रुग्ण व त्याचा परिसर लगेच निर्जंतुक करण्यासाठी फवारणी केली जात असल्याची माहिती पालिका आरोग्य सभापती मनीषा गिरासे यांचे सहाय्यक जितेंद्र गिरासे व आरोग्य विभागाचे शरद महाजन यांनी दिली.