लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर/जैताणे: सामोडे प्र म्हसदी परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला़ यात भाजीपाला उत्पादक शेतकºयाचे नुकसान झाले आहे़एक ते दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने नाल्यांना पुराची परिस्तिथी निर्माण झाली होती़ त्यामुळे शेतात गेलेले मजूरांना काही काळ अडकून राहावे लागले होते़ काही दिवसापासून पावसाच्या प्रतिक्षेतनंतर दमदार पाऊस झाल्याने आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ या पावसात बागायतदार शेतकºयांचे टमाटे, मिरची, कोथंबीर खराब झाली आहे़ दरम्यान तालुक्यातील सामोडे, चिकसे, देगांव, उंभरे, गव्हाणीपाडा या परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याने शेतकºयानी समाधान व्यक्त केले आहे़ म्हसदी नाल्याला पुरबुधवारी सायंकाळी एक सव्वा तास पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण शेत पाण्याने तुडुंब भरले होते. त्यामुळे शेतातील पाणी म्हसदी शिवारातील नाल्यात आल्याने या नाल्याला पूर आला होता़ नाल्याचे पाणी शेतातील बांध फोडून निघाले होते़ त्यामुळे टमाटा मिरची कोथंबीर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़
जैताणे शिवारात वीज पडून गाईचा मृत्यू येथून जवळच असलेल्या शिवाजीनगर शिवारात बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वीज कोसळून एका गाय मृत्यमुखी पडली तर गायीजवळ असणारे संजय शामभाऊ सोनवने यांना विजेच्या धक्का लागला़ जैताणे प्रा.आ.केंद्रात त्यांच्यावर प्रथमोपचारांनतर त्यांना नंदुरबार येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले़ नुकसानीचा पंचनामा तलाठी रोझेकार यांनी केला़