ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.13 : धुळे शहरासह तालुक्यातील विविध भागात रविवारी रात्री उशिरा पावसाने हजेरी दिली. त्यामुळे निम्म्या शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यातील कुसुंबा, नेर, धनूर, शिरूड परिसरातही चांगला पाऊस झाला; तर कापडणे येथे झालेल्या वादळी वा:यासह पावसामुळे तेथील भात नदीला 12 वर्षानंतर पूर आल्याचे चित्र दिसून आले.
रविवारी शहरात दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यानंतर रात्री दहा वाजेनंतर वादळी वा:यासह पावसाला सुरुवात झाली. धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातही झालेल्या पावसामुळे ग्रामस्थांची दाणादाण उडाली.धुळे शहरात रात्री बारा वाजेर्पयत पाऊस सुरू होता. धुळे शहरात मंगळवारी पहाटेही पावसाची रिपरिप सुरू होती.