ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.7 - शहराजवळून जाणा:या नागपूर-सुरत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, या महामार्गावर अवधान चौफुलीजवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या उड्डाणपुलासह 90 लहान व 10 मोठे पूल बांधण्यात येणार आह़े फागणे ते नवापूर (गुजरात राज्य सीमा)र्पयत 140 कि.मी.च्या या महामार्गात ही कामे होणार आहेत़
सहा राज्यांतून जाणारा महामार्ग
नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आह़े धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाग, तसेच ग्रामीण क्षेत्राच्या विकासात भर टाकणारा हा प्रकल्प आह़े नागपूर-सुरत महामार्ग कोलकाता ते हजिरा असा असून, तो पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून जातो़ आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडण्यात येणारा आशियाई महामार्ग क्रमांक 46 म्हणूनदेखील या महामार्गास ओळखले जात़े
ही कामे प्रगतीपथावर
सद्य:स्थितीत नागपूर ते अमरावती, तसेच गुजरात राज्य सीमा ते सुरतर्पयत चौपदरीकरण पूर्ण झाले आह़े तर फागणे-धुळे-साक्री-नवापूर्पयत काम सध्या सुरू आह़े त्यात ठिकठिकाणी उंच-सखलपणा काढणे, माती भरावाचे काम, रस्ता उंचीकरण व मजबुतीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सिमेंट काँक्रीटस्तराची कामे व डांबरीकरणाची कामे प्रगतीत आहेत़ त्याचप्रमाणे पाईप मो:या, बॉक्स, कल्व्हर्ट, लहान व मोठे पूल, पादचारी बोगदे आणि वाहतूक बोगदे ही कामेदेखील विविध स्तरावर प्रगतीत आहेत़