धुळे : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडीतर्फे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात धुळे जिल्ह्यातील शिक्षकही सहभागी झाले आहेत.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त खाजगी, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, १०० टक्के अनुदानित शाळेत विना अनुदानित तुकड्यांवर काम करणारे, १०० टक्के अनुदानित तुकड्यांवर अर्धवेळ काम करणारे शिक्षक कर्मचाऱ्यांना तसेच नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना शासनाने जुन्या पेंशन योजनेपासून वंचीत ठेवलेले आहे.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.दरम्यान भाजप शिक्षक आघाडीतर्फे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर अनिल बोरनारे, एस.पी.पाटील, ए.एस. शिंदे, भागवत पाटील, नाशिक विभाग संयोजक महेश मुळे, भरतसिंह भदोरिया, एन.एस. पाटील, आर.वाय.कान, ए.एस. पठाण, एस.एम.देवरे, एम.एन. पाटील आदींच्या स्वाक्षºया आहेत.
जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:31 PM