लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :वीज नियामक आयोगाने लादलेली वीज दरवाढ ही इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ही दरवाढ घरगुती ग्राहकांसह उद्योगासाठीही मारक आहे. संपूर्ण दरवाढ रद्द करावी अशी मागणी करीत धुळे जिल्हा औद्योगिक संघटनेच्यावतीने महावितरण कंपनीच्या वीज बिलाची होळी करण्यात आली.या आंदोलनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठविण्यात आले. त्यात म्हटले आहे की, विद्युत नियामक आयोगाने नोव्हेंबर २०१६च्या आदेशानुसार निश्चित केलेले आॅगस्ट २०१८ मधील वीजदर मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावीत. तसेच यासाठी ३४०० रूपये कोटींचे अनुदान मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. महावितरण आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये निश्चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेत २० ते ३५ टक्यांनी जास्त आहेत. घरगुती,व्यापारी, व शेतकरी ग्राहकांचे वीजदरही देशातील सर्वाधिक वीजदर पातळीवर पोहचलेले आहेत. ही दरवाढ न परवडणारी आहे. त्याचबरोबर उद्योगांसाठी हानीकारक व राज्याच्या विकासाला खीळ घालणारी आहे. त्यामुळे संपूर्ण वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दरवाढीच्या निषेधार्थ क्युमाईन क्लबसमोर वीज बिलाची होळी केली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी वीज ग्राहक व औद्योगिक संघटनेचे शाम पाटील, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष सुभाष कांकरिया, खान्देश इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असो. चे सचिव भरत अग्रवाल, अवधान मॅन्युफॅक्चर्स असो.चे अध्यक्ष नितीन देवरे,महेश नावरकर, पावरलूम चॅरिटेबल असोसिएशनचे अश्पाक अन्सारी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
धुळ्यात औद्योगिक संघटनांतर्फे वाढीव वीज बिलाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:11 AM
विविध मागण्यांचे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
ठळक मुद्देऔद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेत २० ते ३५ टक्यांनी जास्तदरवाढ न परवडणारीसंपूर्ण वीज दरवाढ रद्द करावी