लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अनलॉकच्या पाचव्या टप्यात आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली असून, गेल्या महिन्याभरात प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद बघता आता धुळे आगारातून जळगाव, नाशिक, व औरंगाबाद मार्गावर दर तासाला बस धावणार असल्याचे धुळे आगार प्रमुखांनी कळविले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २२ मार्चपासून महामंडळाची बससेवा बंद होती. त्यानंतर २३ मे रोजी जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र या बससेवेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तर २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा बस सुरू झालेली आहे.आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली तरी सुरवातीला प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्याची परवानगी होती. मात्र नंतर उत्पन्न कमी मिळत असल्याने राज्य शासनाने पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला मर्यादीत स्वरूपात लांब पल्याच्या बसेस धावत होत्या. मात्र आता प्रवाशांचा प्रतिसाद व आगामी सण उत्सव लक्षात घेता बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली आहे. धुळे आगारातून जळगाव, नाशिक, औरंगाबाद मार्गावर आता प्रत्येक तासाला बस धावणार आहे. यात जळगाव व औरंगाबादसाठी सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ४ पर्यंत तर नाशिकसाठी सकाळी ५.३० वाजेपासून सायंकाळी ७ पर्यंत प्रत्येक तासाला बस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख अनुजा दुसाने सोनार यांनी कळविले आहे.पुण्यासाठी फेºया वाढवल्यादरम्यान पुणे मार्गावर सुरवातीला एकच बस धावत होती. मात्र आता सकाळी ६३०, ८, १० व दुपारी १२ व २.३० व रात्री ८वाजता बसेस धुळे आगारातून सोडण्यात येत आहे. याशिवाय चोपडा, यावल, रावेर या मार्गावर बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.मध्यप्रदेशसाठी अजुनही प्रतीक्षाधुळे आगारातून अद्यापही मध्यप्रदेशसाठी बससेवा सुरू झालेली नाही. सध्या नाशिक-इंदूर ही एकमेव बस धावत आहे. मात्र मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्टÑात येऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे येथूनही इंदूर, बºहाणपूरसाठी बसेस सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.
जळगाव, औरंगाबाद, नाशिक मार्गावर दर तासाला बस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 8:30 PM