आॅनलाइन लोकमतधुळे : सर्व कर्मचाºयांना जुनीच महाराष्टÑ नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ची पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी पासून वंचीत ठेवणारा २३ आॅक्टोबर २०१७चा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी शिक्षकांनी आणलेला घंटा वाजवून आंदोलकांनी शिक्षकविरोधी धोरणाचा निषेध केला. निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेत ३१ आॅक्टोबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना महाराष्टÑ नागरी सेवा अधिनियम (निवृत्ती वेतन) १९८२ व १९८४ योजना व राष्टÑीय पेन्शन योजना लागू केली आहे. या योजनेतील कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे. त्याविरूद्ध आंदोलन करून जुन्या पेन्शन योजनेची मागणी करीत आहे. १४ डिसेंबर २०१५ रोजी नागपूर विधीमंडळावर आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चातील शिष्टमंडळाला वित्तमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. १६ मार्च १६ रोजी मुंबईत धरणे व ७ डिसेंबर १६ रोजी नागपूर विधीमंडळ अधिवेशनादरम्यान एकदिवसीय उपोषण करण्यात ओ. मात्र मागण्यांची पूर्तता झालेली नाही. सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भातील २३ आॅक्टोबर २०१७चा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.शिक्षकांच्या या घंटानाद आंदोलनाला अनेक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.यावेळी संघटनेचे सागर पवार, श्यामकुमार पाटील, संजय पवार जयसिंग भुईटे,ज्ञानेश्वर बाविस्कर, संदीप पवार, मनोज परदेशी, जगदीश पाटील, भूषण सूर्यवंशी, सचिन राऊत, भास्कर परदेशी, योगेश धात्रक, शुभांगी पाटील, सोनी पावरा, छाया परदेशी यांच्यासह जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवानंद बैसाणे, शरद पाटील, रवींद्र खैरनार, राजेंद्र नांद्रे, चंद्रकांत सत्येसा, संजय पवार, चंद्रकांत पाटील, देवीदास महाले, विजय पाटील, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
धुळ्यात जुनी पेन्शन योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 5:16 PM
जिल्ह्यातील शिक्षक एकवटले : जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे आंदोलन
ठळक मुद्देजिल्ह्यातील शेकडो शिक्षक उपस्थितघोषणांनी परिसर दणाणला मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले