दोंडाईचा : कोरोनाचा संसर्ग वाढला तर दोंडाईचा शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा शासकीयरित्या अधिग्रहित केली जाईल, अशी शक्यता नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक सावंत आणि वैैद्यकीय अधीक्षक डॉ़ ललितकुमार चंद्रे यांनी व्यक्त केली़ दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शहरातील डॉक्टरांनी दिले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पूर्वतयारीसाठी येथील नगरपालिकेत रविवारी सकाळी अकरा वाजता खाजगी डॉक्टरांची बैठक झाली़ या बैठकीला मुख्याधिकारी दीपक सावंत, आरोग्य सभापती मीनाक्षी गिरासे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ ललितकुमार चंद्रे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ भूषण मोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ़ दीपक सावंत, आरोग्य धिकारी शरद महाजन, स्वीय सहाय्यक जितेंद्र गिरासे यांच्यासह डॉ़ रवींद्र टोणगावकर, डॉ़ हेमंत नागरे, डॉ़ ओमप्रकाश अग्रवाल, डॉ़ जयेश ठाकूर, डॉ़ बी़ एल़ जैन, डॉ़ अमोल भामरे, डॉ़ गणेश खैरनार, डॉ़ प्रफुल दुग्गड, डॉ़ भूषण चौधरी, डॉ़ विशाल भामरे, डॉ़ राजेश टोणगावकर, डॉ़ सचिन पारख, डॉ़ अविनाश मोरे, डॉ़ चेतन पाटील, डॉ़ कुणाल बच्छाव, डॉ़ संतोष आव्हाड, डॉ़ अनिल धनगर, पॅथॉलॉजिस्ट राजेंद्र परदेशी आदी शहरातील सुमारे ३० डॉक्टर उपस्थित होते.उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका, पोलिस प्रशासन व सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्रित येउन लढा देणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले़ सर्व नागरिकांनी लॉकडाउनचे काटेकोर पालन करावे़ कोरोना आपत्ती काळात शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले़बैठकीत मुख्याधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षकांनी कोरोना संसर्ग रोखणे बाबत भूमिका मांडली. बैठकीत कोरोणा आपत्ती काळात मदतीचे आव्हाहन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक जिल्हाबंदी, सुरक्षित अंतर नियमन, कोरोना विलगीकरण कक्ष आणि कोरोना केअर सेंटर याबद्दल माहिती देण्यात आली. पीपीई, एन ९५ मास्क आणि सॅनिटायझर यांच्या उपलब्धते बद्दल चर्चा करण्यात आली.देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत़ शेजारच्या सेंधवा जिल्ह्यात आणि मालेगावमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे़ नंदुरबारमध्येही रुग्ण सापडला आहे़ अमळनेरातही एका वृध्द महिलेला कोरानाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे धुळे जिल्ह्यात अधिक दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत़ त्यासाठी नगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणखी प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे़सुदैवाने दोंडाइचात एकही रुग्ण नाहीसाक्री तालुक्यात एका वृध्द इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने भिती वाढली आहे़ सुदैवाने अजुनपर्यंत दोंडाईचात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी गाफिल राहून चालणार नाही़ जिल्ह्याच्या चौफेर रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिकाधिक दक्षता घ्यावी लागेल़ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणखी प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल़ त्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन बैठकीत केले़
़़़ तर खाजगी डॉक्टरांचीही सेवा अधिग्रहित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:05 PM