ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 15 - शहरातील मौंलवीगंज व मच्छिबाजार येथे छापा टाकून अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सुमारे एक ते दीड लाखांचा गुटखा जप्त केला आह़े जप्त केलेला साठा पुढील कार्यवाहीसाठी अन्न व सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आह़े मौलवीगंज व मच्छिबाजार परिसरात बेकादेशीपणे गुटख्याचा साठा करण्यात आला असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी त्याच्या पथकाला कारवाईचे आदेश दिल़े पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला़ मौलवीगंज येथे एका किराणा दुकानात व मच्छिबाजार परिसरात एका दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये विमल गुटख्याचा साठा मिळून आला़ तेथून एकुण एक ते दीड लाख रूपये किंमतीचा सात पोते गुटखा जप्त करण्यात आला़ जप्त केलेला साठा पुढील कार्यवाहीसाठी अन्न व सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आह़े याबाबत रात्री उशिरार्पयत आझादनगर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती़ 70 हजारांचा दारूसाठा जप्त, दोघांविरूध्द गुन्हाविशेष पथकाने धुळे शहरातील चैनी रोड, गल्ली क्रमांक 4 मधील सागर बिअर बारवर छापा टाकला़ तेथून 70 हजार रूपयांचा देशी-विदेशी दारू, बियरचा साठा जप्त केला़ तेथे बेकायदेशीपणे दारू विक्री होत होती़ याप्रकरणी बिअरबार मालक संतोष गोपालदास जयस्वाल व हेमंत रमेश सातभाई (रा़ मोहाडी) यांच्याविरूध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
धुळ्य़ात दीड लाखाचा गुटखा जप्त
By admin | Published: June 15, 2017 12:53 PM