दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून कोराेना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळ सुरू झाली. एवढेच नाही तर सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभाही ॲाफलाइन होऊ लागली; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलेला असताना जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत मात्र येणाऱ्यांची वर्दळ अजूनही कायम आहे. अनेक जण तर मास्क न लावताच येतात. शिवाय येथे येणाऱ्यांचे तापमान मोजण्याचीही कुठलीही व्यवस्था नाही. चुकून एखादा बाधित आला तर त्याची लागण त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरून येणाऱ्या- जाणाऱ्यांवर अद्याप कुठलेच निर्बंध न घातल्याने, कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्येही थोडे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात यावे, अशी अपेक्षा काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.
जिल्हा परिषदेत वर्दळ अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:49 AM