शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

महाराष्ट्रभरातून मला सहानुभूती मिळतेय, एकनाथ खडसेंनी सांगितली 'फोन की बात'

By महेश गलांडे | Published: December 26, 2020 4:34 PM

मला ईडीची नोटीस मिळाली हे खरं असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात फोन कॉल्स येत आहेत. याउलट मला असं जाणवलं की, महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत.

ठळक मुद्देमला ईडीची नोटीस मिळाली हे खरं असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात फोन कॉल्स येत आहेत. याउलट मला असं जाणवलं की, महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत.

धुळे - बीएचआर संस्थेतील घोटाळ्याची कागदपत्रे देणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. आधीच गेली सहा वर्षे खडसे भूखंड घोटाळ्यावरून वनवासात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता हेच राजकीय वितुष्ट खडसेंना पुन्हा महागात पडण्याची चिन्हे आहेत. एकनाथ खडसेंनी प्रथमच ईडीकडून नोटीस मिळाल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर, मीडियाशी बोलताना, आपणास राज्यभरातून सहानुभूती मिळत असल्याचंही ते म्हणाले. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर दौऱ्यावर असताना खडसेंनी ईडीच्या नोटीशीची कबुली दिली. ''शिरपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मला ईडीची नोटीस मिळाली हे खरं असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात फोन कॉल्स येत आहेत. याउलट मला असं जाणवलं की, महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत, त्यांच्याकडून एकप्रकारची सहानुभूतीच व्यक्त करण्यात येत असल्याचं'' एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. तसेच, लोकांना असं वाटतंय की, हा एकप्रकारचा अन्यायच आहे. वारंवार चौकशा करत राहणं हे लोकांना आवडलेलं दिसत नाही. परंतु, निर्णय झालेला असतो, त्याला अनुसरुन आपल्याला काम करायचं असतं, असेही खडसेंनी म्हटलं. दरम्यान, ईडीने 30 डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस खडसेंना पाठविली आहे. दरम्यान, आता ही नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुण्यातील भूखंड घोटाळा की आणखी कशाबाबत ते लवकरच स्पष्ट होणार आहे. 

एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी संस्थेतील 1100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचारप्रकरणी जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असल्याचं सांगितलं होतं. तसेच, संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याचीही माहिती असून ती देणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे आणि पुणे येथे दाखल गुन्ह्या संदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे‌.

ईडीची वाट न पाहता सीडी लावा...

‘ तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू’ म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरमध्ये एकनाथ खडसेंना दिले होते.  तुम्ही ईडी लावाल तर आम्ही तुमची सीडी दाखवू असे आव्हान खडसेंनी फडणवीसांना दिले होते. यावर फडणवीस म्हणाले, इडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे निश्चित काहीतरी माहिती असेल. त्याशिवाय ते रेड टाकत नाही. मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. चूक झाली असेल तर एजन्सी कारवाई करेल. आमच्या सरकारच्या काळातील वीज मंडळाच्या कारभाराची चौकशी करणार असाल तर खुशाल करा.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDhuleधुळेBJPभाजपा