लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी केंद्र संचालक पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान परीक्षा यंत्रणेबाबत केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर अविश्वास असल्यास, शासकीय यंत्रणेद्वारे परीक्षा घ्यावी अशी मागणी धुळे जिल्हा समन्वय समितीने बैठकीनंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.बारावीच्या परीक्षेत सर्वच केंद्रावर कॉपीचे प्रकार सर्रास सुरू असल्याने, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी शुक्रवारी सायंकाळी केंद्र संचालक, विस्तार अधिकारी यांची कानउघडणी केली होती. सीईओंच्या भूमिकेनंतर जिल्हा समन्वय समितीने बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉपीचे समर्थन कोणीही करत नाही. कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करित आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेच्यावेळी केंद्र संचालक, बैठे पथक, दक्षता समिती सदस्य, पोलीस पर्यवेक्षक व इतर कर्मचारी कार्यरत असतात. अशावेळी कॉपी प्रकरणी केवळ केंद्र संचालक, पर्यवेक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावरच कारवाई करणे योग्य नाही. परीक्षा केंद्रावर काम करणारे दबावातच काम करतात. गेल्या २१ तारखेपासून परीक्षेच्या कालावधीत काही केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल व निलंबन करण्यासंदर्भात नोटीसा बजवण्यात आलेल्या आहेत. त्या मागे घेण्यात याव्यात.परीक्षा कालावधीत कर्मचाºयांना संरक्षण दिले जात नाही. त्यांच्यावर होणाºया हल्याची दखल घेतली जात नाही.परीक्षा यंत्रणेवरील गैरसमजुतीपोटी कारवाईचा आग्रह कायम राहिल्यास नाईलाजास्तव परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आम्हाला भाग पाडू नका असेही दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.परीक्षा कालावधीत आपल्या यंत्रणेमार्फत संबंधित केंद्रावरील कर्मचाºयांच्या बाबतीत कारवाई करण्याच्या संदर्भात वारंवार प्रसिद्धी दिली जाते. यामुळे शिक्षणक्षेत्र बदनाम होत असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी, परीक्षेचे कामकाज करण्यास अनुकूल नाही.परीक्षेत कॉपी व गैरप्रकार होऊ नयेत; यासाठी वेळोवेळी इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थी, त्यांचे पालक, संस्थाचालक, परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक, शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची दक्षता समिती स्थापन करून परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात होण्याबाबत अनेक वेळा सभा बैठका घेऊन उद्बोधन नेहमीच करीत आलो असल्याचे निवेदनात म्हटले आहे.केंद्रातील कर्मचाºयांवर हल्ला होणार नाही, ही जबाबदारी शिक्षण विभागाने घेऊन, असा अनुचित प्रकार घडल्यास, खात्याच्या सक्षम अधिकाºयाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात यावी.बैठकीला समन्वयक संजय पवार, भरतसिंह भदोरिया, विजय बोरसे, बी.ए.पाटील, आर.व्ही.पाटील, वाय.एन. पाटील, देवानंद ठाकूर, एस.बी. सूर्यवंशी, महेश मुळे, डी.जे. मराठे, वाय.यू.कढरे, सुनील पवार, रवींद्र मोरे, आर. डी. शिसोदे, डी.बी.साळुंखे, प्रा. डी. पी. पाटील, कौसर शेख, इकबाल नजीर, शाहीद अख्तर, आय. एन.पठाण, लोटन मोरे, प्रफुल्ल बोरसे, लतिफ देशमुख, अबिद अन्सारी, जे. बी. सोनवणे, अशोक गिरी, जे.एच. पाटील, अकीम खान नजीम खान, के. पी. चव्हाण, पी. बी. माळी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.जिल्हा समन्वय समितीने स्पष्ट केली भूमिका
विश्वास नसल्यास शासकीय यंत्रणेद्वारे परीक्षा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:13 PM
धुळे जिल्हा समन्वय समिती : जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर घेतला निर्णय
ठळक मुद्देजिल्ह्यातील केंद्रावर कॉपी प्रकारामुळे सीईओ संतप्तकेंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा दिला होता इशाराकेंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा दिला होता इशारा