शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

धुळे मनपात बेकायदेशीर भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 10:01 PM

स्थायी समिती : तत्कालीन आयुक्तांची विभागीय चौकशी?

धुळे : महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे स्थायी समितीच्या सभेत काढण्यात आले़ तत्कालिन आयुक्त हनुमंत भोंगळे यांच्या कार्यकाळात भरती प्रक्रियेत गडबड झाली़ याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असल्याचे आस्थापना विभाग प्रमुख नारायण सोनार यांनी सांगितले़ सदस्य नागसेन बोरसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सोनार बोलत होते़येथील महानगर पालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली़ यावेळी सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह विमलबाई पाटील, नागसेन बोरसे, रावसाहेब पाटील, संतोष खताळ, सुरेखा देवरे, संजय भील, मुक्तार मन्सुरी, शेख शाहजहान बी़ बिस्मील्ला, सुभाष जगताप, अन्सारी सईदा म़ इकबाल, अमीन पटेल यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते़भाजपचे सदस्य नागसेन बोरसे यांनी आस्थापना विभागातील गैरकारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले़ या विभागाचे अधीक्षक नारायण सोनार यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले़ सोनार यांनीही न डगमगता सडेउत्तरे दिली़ बोरसे यांनी अनुसुचित जाती जमातीची किती पदे महापालिकेत रिक्त आहेत असा प्रश्न उपस्थित केला़ तसेच तत्कालिन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कार्यकाळात पद भरतीसाठी जाहीरात काढली गेली होती, तिच्यावर काय कारवाई झाली याबद्दल प्रश्न विचारले़ आस्थापना विभागामार्फत झालेल्या एका भरती प्रक्रियेत बडबड झाल्याविषयी लक्ष वेधले़ तत्कालिन आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी केलेल्या भरतीवेळी तीन जागांसाठी जाहिरात देण्यात आली़ मात्र, प्रत्यक्षात चार जणांची भरती कशी केली गेली? एका महिला कर्मचाऱ्याची भरती बेकायदेशीर असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आले़ यासंदर्भात सोनार यांना बोरसे यांनी जाब विचारला़ यावर त्यांनी थेट कबुलीच दिली़ एका महिला कर्मचाºयाची बेकायदेशीर भरती झाली आहे़ मात्र, ती भरती आपण नव्हे तर तेव्हाचे आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी केली असल्याचे सोनार यांनी सांगत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले़ याप्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला़ हद्दवाढीतील गावांमध्ये शौचालयांची दुरवस्था झालेली आहे़ मैला बाहेर येत असल्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण असून तातडीने उपाययोजना झाली पाहीजे अशी मागणी सदस्यांकडून झाल्यानंतर उपायुक्त गिरी यांनी दखल घेत लक्ष देण्याची सूचना स्वच्छता विभागाला केली़थंडीचे दिवस सुरु असून गोरगरीबांना शालचे वाटप महापालिकेने करावे़ याची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी अमीन पटेल यांनी केली़ यावर महापालिकेच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करुन धोरणात्मक निर्णय घेतल्यावरच हे करता येऊ शकते, असे अर्थ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले़ तर, दानशूर व्यक्तींकडून आपण आवाहन करुन शाल वाटप करता येऊ शकेल़ यासाठी मी प्रयत्न करेल, असे गिरी यांनी सांगितले़ दरम्यान, स्थायी समितीच्या सभेत अनुषंगिक विषयावर चर्चा करण्यात आली़चर्चेविना विषय मंजूरमनपा अंतर्गत २०१९-२० या वर्षाकरीता जलशुध्दीकरण केंद्रावर अ‍ॅलमचा पुरवठा करण्याबाबत ई-निविदा दर मागविण्यात आले़ त्या विषयावर सभागृहात चर्चा अपेक्षित होती़ मात्र, अजेंड्यावरील विषयाला चर्चेविना लागलीच मंजुरी देण्यात आली़ तर, यावेळेस नागरिकांच्या समस्यांवर कोणत्याही प्रकारची आगपाखड झाली नाही़

टॅग्स :Dhuleधुळे