ठळक मुद्देरेल्वे स्टेशन रस्त्यावरील एकूण घरांपैकी ५० ते ६० लोकांचे पुनर्वसन हे मोहाडी येथील घरकुलांमध्ये केल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक जण पुनर्वसनापासून वंचित आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांना एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांमध्ये घरकुले द्यावीत, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, मिलिंद वाघ, योगेश जगताप, गौतम बोरसे, योगेश बोडखे, आकाश बागुल, भोला अहिरे, सागर मोहिते, इंद्रजित कर्डक, सनी जाधव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रेल्वेस्टेशनरोडवर झालेल्या अतिक्रमणधारकांचे पूर्णपणे पुनर्वसन करावे, अशी मागणी भारीप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी मनपात निदर्शने केली. तसेच मनपाचे साह्यायक आयुक्त एस. आर. गोसावी यांना निवेदनही दिले. निवेदनात म्हटले आहे, की मनपा प्रशासनाने रेल्वे स्टेशनरोडवरील अतिक्रमण गुरुवारी काढले. चूकीच्या पद्धतीने ही कारवाई झाली आहे. पोलीस बळाचा वापर करून अनंतराव बागुल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध आहे.