दोंडाईचा : नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे़राज्यात तीन पक्षांचे मिळून तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांचा पुर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता मिळाल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली़ त्यात अनेक अटी घातल्या. त्यात दोन लाखांपर्यंतच्या कर्ज माफीची प्रक्रिया मोठा गाजावाजा करून सुरूही झाली. तसेच हिवाळी अधिवेशनात नियमित कर्ज भरणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान व २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाºया खातेदारांनाही कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही़ त्याची अंमबजावणी व्हावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली आहे.सत्तेत येण्यापूर्वी आताचे सत्ताधारी असलेल्या तिनही पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी करण्याचे अनेक वेळा आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपला शब्द फिरविला आहे. त्यांनी दिलेल्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी नियमित कर्जाची रक्कम भरतात व ज्यांची कर्जाची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त आहे अश्या शेतकºयांना वगळण्यात आले. मात्र जनतेचा रोष समोर आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात या शेतकºयांनाही प्रोत्साहनपर अनुदान व कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु सहा महिने उलटूनही त्याबाबतचा अध्यादेश अजून पर्यंत काढण्यात आलेला नाही. आता संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सर्वत्र बंद असताना जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र आपला जीव धोक्यात टाकून अन्न पुरविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या फळ व भाजीपाला पिकविणारे शेतकºयांना कवडीमोल भावाने आपले उत्त्पन्न विक्री करावे लागत आहे. कापूस व धान्य घरात पडून आहे. त्यामुळे शेतकºयांची अर्थव्यवस्था पुर्णत: कोलमडली असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. खरीप हंगाम नजीक आलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून या संकटकाळात शेतकºयांना दिलासा द्यावा अशीही मागणी आ. रावल यांनी केली आहे.
घोषणांची अंमलबजावणी तात्काळ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 9:51 PM