शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
3
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
4
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
6
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
7
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
8
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
9
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
10
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
11
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
12
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
13
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
14
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
15
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
16
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
17
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
18
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
19
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
20
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

दुचाकी चोरट्यांच्या चौकशीत लागला घरफोडीचाही तपास!

By देवेंद्र पाठक | Published: November 30, 2023 6:00 PM

‘एलसीबी’ची कारवाई : ९ दुचाकींसह साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

देवेंद्र पाठक, धुळे : गुरुद्वारा येथील उड्डाणपुलाच्या खालून एका चोरट्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी चाेरल्याची कबुली पोलिसांना दिली. शिवाय चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी केल्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजाराचा मुद्देमालासह ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुचाकी चोरीच्या घटना सध्या सातत्याने सुरू आहेत. अशातच दुचाकी चोरणारा चोरटा हा गुरुद्वाराजवळ उभा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच पथक रवाना करण्यात आले. गुरुद्वारा उड्डाणपुलाच्या खाली दोन अल्पवयीन मुलांसह फैजान मुजम्मिल अन्सारी (वय २२, रा. कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीच्या दुचाकीची कबुली देत अन्य ९ दुचाकी देखील पोलिसांना काढून दिल्या. चोरीच्या दुचाकींमध्ये ४ जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांची किंमत ३ लाख ४१ हजार आहे; तसेच फैजान अन्सारी आणि दोन अल्पवयीन अशा तिघांनी मिळून संत नरहरी कॉलनी, अंबिकानगर येथील बंद घरात चोरी केल्याची माहिती देत ६ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि ५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. दुचाकीसह चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी प्रकाश पाटील, श्याम निकम, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, योगेश साळवे, हर्षल चौधरी यांनी कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी