- राजेंद्र शर्मा
पिंपळनेर : येथील उपबाजार समितीत बुधवारी कांद्याला ५३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. कांद्याची आवक कमी झाल्याने गेल्या ४ ते ५ दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. पण ही वाढ ठराविक शेतकऱ्यांच्याच पदरी आली आहे.
येथील उपबाजार समितीत बुधवारी ७० वाहनांचा लिलाव संपन्न झाला व्यापारी यांनी चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सरासरी कांद्याला भाव हा ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल होता. तर डागी कांदा हा २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल होता. तर हलक्या प्रतीचा कांदा देखील २००० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत व्यापाऱ्यांनी बोली सुरू केल्याने सुरुवातीपासून दर जास्त होते कांद्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच कांद्याची मागणी वाढल्याने हे दर वाढले आहे.
कांदा शेतातून निघताच भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवला होता. वाढत्या उष्णतेमुळे चाळीत कांदा सोडू लागला यामुळे शेतकऱ्यांनी कमी भावात कांदा हा विक्रीस कळला यामुळे शेतकऱ्यांना कमी भावाने आपला कांदा विकावा लागला तसेच कांद्यामध्ये सड जास्त होत असल्याने शेतकऱ्यांनी त्वरित कांदा विक्रीस कळला यामुळे कमी भावात देखील शेतकऱ्यांना आपला कांदा विकावा लागला व समाधान मानावे लागले यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघणे मुश्कील झाले. कांद्याचे भाव काही अंशी वाढायला सुरुवात होताच केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क वाढ केली यामुळे कांद्याचे दर पुन्हा गडगडले कांद्याचा भाव वाढ होत नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात येता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चाळीस साठवलेला कांदा हा विक्रीस नेला पण आता कांदा संपण्यात आल्याने ठराविक शेतकऱ्यांकडेच कांदा अल्पसाठा शिल्लक असून कांद्याचे दर वाढले आहेत. हा वाडी भाव ठराविक शेतकऱ्यांच्या पदरी मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर हे अधिक वाढतील असे व्यापारी सांगतात.