लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालक उन्नती योजना, पशुसंजीवनी अॅप व आदर्श पशुपालक पुरस्कार अशा नावीन्यूपर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजना राबविण्यासाठी पुणेस्थीत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाची मंजुरी आवश्यक असून त्यादृष्टीने जिल्हा परिषदस्तरावर प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व विशेष सर्वसाधारण सभेत या योजनांना मंजुरी मिळाली आहे. या योजनांना मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष या योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळणार असून दुग्धोत्पादनातही वाढ होणार आहे. सन २०१७-२०१८ याकालावधीसाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालक उन्नती योजनेंतर्गत मिल्किंग मशीन वाटप, खवा मशीन व पॅकिंग मशीन पुरवठा केले जाणार आहे. त्यासोबत पशुपालकांची गैरसोय होऊ नये; म्हणून पशुसंजीवनी अॅपदेखील तयार केले जाणार आहे. तसेच आदर्श पशुपालक पुरस्काराचे वितरण यावर्षी केले जाणार आहे. या तिन्ही योजनांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही मंजुरी मिळाली आहे. परंतु, या योजना राबविण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाची मंजुरीही आवश्यक असल्याने आता जिल्हा परिषदस्तरावर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज रापतवार यांनी दिली. पशुसंजीवनी अॅपमुळे पशुपालकांची गैरसोय टळणार पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंजीवनी अॅप’ तयार केले जाणार आहे. या अॅपमुळे पशुपालकांची गैरसोय टळणार आहे. या अॅपमुळे पशुपालकांना जिल्ह्यात असलेली पशुवैद्यकीय दवाखाने, गावनिहाय पशुधनाची संख्या, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना लसीकरणाचे वेळापत्रक, तज्ज्ञांचा मार्गदर्शक सल्ला, पशुसंवर्धन विभागच्या सेवा व सुविधा, पशुसंवर्धन विभागाचे कार्यमोहीम वेळापत्रक, प्रशिक्षण कार्यक्रम आदी बाबी एका क्लिकवर कळणार आहे. या अॅप्सची रचना कशी असली पाहिजे. त्यात नेमके काय फिचर्स असतील, याचा प्राथमिक अहवाल पशुसंवर्धन विभागाने तयार केला आहे.
आदर्श पशुपालक पुरस्कार होणार सुरुशेतीला पुरक व्यवसाय म्हणून पशु पालनावर भर दिला जातो. शेतकºयांना पशुधन संगोपनासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आदर्श पशुपालक पुरस्कार योजनाही यंदापासून सुरू करण्यात येणार आहे. आदर्श पशुपालन करणाºया शेतकºयांची निवड करुन त्यांचा गौरव केला जाणार आहे. ही निवडही जि.प. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीमार्फत केली जाणार आहे.