आॅनलाइनधुळे- शहरातील दोन नामांकित डॉक्टरांच्या घरी व रूग्णालयावर आयकर विभागाने आज सकाळी धाड टाकली आहे. दुपारी उशिरापर्यंत दोन्ही ठिकाणी तपासणी सुरू होती. या धाडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे.शहरातील मालेगाव रोड व साक्री रोडवर असलेल्या या नामांकित डॉक्टरांच्या घरी व रूग्णालयावर आज सकाळी आयकर विभागाचे पथक धडकले. यात काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागले असून, या कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. या दोन्ही डॉक्टरांनी शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून, स्वत:चा फायदा केल्याची चर्चा शहरात सुरू होती. या दोन्ही डॉक्टरांच्या रूग्णालयाच्या बाहेर वाहनांचा ताफा उभा होता. शहरातील दोन नामांकित डॉक्टरांच्या घरी व रूग्णालयावर आयकर विभागाची धाड पडल्याचे समजताच अनेकांनी या रूग्णालयाकडे धाव घेतली होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमकी काय कारवाई केली याची माहिती मिळू शकलेली नाही.
धुळ्यातील दोन रूग्णालयांवर आयकर विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 2:45 PM
कागदपत्रांची कसून तपासणी सुरू
ठळक मुद्देसकाळीच आयकर विभागाचे पथक डॉक्टरांच्या घरी, रूग्णालयात धडकलेअधिकाºयांनी कागदपत्रे ताब्यात घेतल्याची चर्चाकाय कारवाई केली याची अधिकृत माहिती मिळालेली नाही