लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चौपदरीकरणात पिंपरी शिवारात उभारण्यात येणाºया उड्डाणपुलासाठी संपादित जमिनीच्या मोबदला रकमेतील अपहारप्रकरणी अमळनेर पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल झाला. ज्या जमिनीचा हा मोबदला होता तिचे क्षेत्रफळ ६ हजार ६०० चौ.मी. एवढे असून तिचा वाढीव मोबदला म्हणून तब्बल २ कोटी ९५ लाख ६९ हजार ५७२ रुपये मंजूर झाला होता, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. या रकमेतून टीडीएस कापून प्रत्यक्ष २ कोटी ७९ लाख ७८ हजार २६२ रुपये या प्रकरणातील तक्रारदार दिनेश भिल याच्या नावावर जमा झाले होते. ही सर्व रक्कम हडपण्याचा संशयितांचा डाव होता, असे तक्रारीमुळे स्पष्ट होत आहे. पिंपरी शिवारातील या जमिनीचा गट क्र. २/३ हा असून तिचे एकूण क्षेत्रफळ ६ हजार ६०० चौरस मीटर एवढे आहे. शेतीच्या प्रचलित परिमाणात दीड एकर व वर काही गुंठे एवढी ही जमीन आहे. ही जमीन संपादित झाल्यानंतर १६ मे २०१३ रोजी या जमिनीचा मूळ मोबदला म्हणून विकास कन्हेरसिंग भिल यांना १४ लाख रुपये मिळाले होते. त्यांनी तत्पूर्वीच ही जमीन धुडकू मोरे यांना २६ लाख रुपयांना विकली होती. यानंतर त्यांचे निधन झाल्याने जमीन त्यांचा वारसदार दिनेश भिल यांच्या नावे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयितानी महामार्गासाठी संपादित या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी केलेल्या प्रकरणावर तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यांनी दिलेल्या दराच्या निर्णयानुसार वाढीव मोबदल्यासाठी निवाडा (अॅवार्ड) तयार करून तो ४ डिसेंबर २०१७ रोजी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास प्राधिकरणाकडून २ कोटी ९५ लाख ६९ हजार ५७२ रुपये वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. टीडीएस वजा करून प्रत्यक्षात दिनेश भिल यास २ कोटी ७९ लाख ७८ हजार रुपये वाढीव मोबदल्याच्या स्वरूपात मिळाले. त्यांच्यात करार झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिनेश भिल यांनीच तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी या दोन्ही राजकीय दिग्गजांसह इतर संशयितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी जिल्ह्यात व्यापक चर्चा होत आहे. मनपाच्या रेकॉर्डवर महाले अद्याप राष्टÑवादीचे नगरसेवक सतीश महाले हे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक असून त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. ते सध्या शिवसेनेचे महानगर प्रमुखही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी पक्षबदल करून राष्टÑवादी कॉँग्रेसमधून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मात्र ते अद्याप मनपाच्या रेकॉर्डवर राष्टÑवादीचे नगरसेवक आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेसने त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. शिवसेना पक्षाने त्यांच्यावर महानगर प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मोहाडी परिसरात शिंदेचे राजकीय वर्चस्व अबाधित विनायक शिंदे हे राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्यात शिंदे यांची ओळख आहे. त्यांनी या आधी राज्य विधानसभेच्या निवडणुकीत धुळे मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत दिली. त्यात ते पराभूत झाले होते. ते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. मोहाडीत त्यांचे राजकीय वर्चस्व असून ते किंवा त्यांनी उभा केलेला उमेदवारच तेथे निवडून येतो. राजकारणात ते सतीश महाले यांचे कट्टर विरोधक मानले जात असले तरी वाढीव मोबदला अपहार प्रकरणात ते त्यांच्यासोबत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘फेसबुक’वरील लाईव्ह प्रतिक्रिया अंगाशी! शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीष महाले यांनी आपल्याबद्दल पसरलेल्या अफवेबाबत ‘फेसबुक’वर लाईव्ह प्रतिक्रिया दिली. ती सोशल मीडियाद्वारे शहरात सर्वत्र ‘व्हायरल’ होऊन त्यांच्या विरोधकांपर्यंतही पोहचली. त्यामुळे त्यांना आयतेच कोलीत मिळाले. त्यांच्या विरोधकांनी हे फेसबुक लाईव्ह थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवले. आणि मग तेथूनच पुढील सर्व सूत्रे हालली, अशी सर्वत्र चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या संदेशानंतर मग महाले व शिंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली. एकूण विरोधकांनी बरोबर वेळ साधली, असेही बोलले जात आहे.भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शी स्वरूपात राबविण्यात आलेली आहे. वाढीव मोबदल्याच्या प्रकरणांवर गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी दिलेल्या वाढीव दरानुसार विभागातर्फे निवाडे करून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणास पाठविले होते, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रवींद्र भारदे यांनी दिली.