चंद्रकांत सोनार । धुळे : आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको? हा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पटू लागला असून, ‘नकुशी’ आता हवीहवीशी वाटू लागली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून गेल्या १६ महिन्यात ५ हजार ५२२ मुलांच्या तुलनेत तर ५ हजार ५८० मुलींनी जन्म घेतला आहे़ मुलींची संख्या ५८ ने जास्त असून प्रबोधनाचा परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांत स्त्री भ्रूणहत्या हा विषय ऐरणीवर आला आहे. मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमाचा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. राज्यात मुला-मुलींचे हजारामागे ८९४ असे प्रमाण असताना जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ते सरासरी ९०० पर्यंत पोहोचले आहे. महापालिका आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांत १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१९ या १६ महिन्याच्या कालावधीत ५ हजार ५२२ मुलांनी ५ हजार ५८० मुलींनी जन्म घेतली आहे़ मुलांच्या तुलनेत जन्मलेल्या मुलींची संख्या ५८ने अधिक असुन यंदाचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण ८६.०१ इतके आहे.कायद्याची भितीस्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्र (विनियमन व दुरुपयोगावरील प्रतिबंध) कायदा १९९४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणे गुन्हा आहे. दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे हा यामागील उद्देश आहे. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यात मनपा आरोग्य विभागाला जरी यश मिळाले असले तरी स्त्री-भ्रूणहत्येचा डाग १०० टक्के पुसण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़अॅक्टीव्ह ट्रॅकर्स’ अनिवार्य करावेप्रसूतीपूर्व लिंगनिदान रोखणे मोठे आव्हान आहे. यासाठी राजस्थान, उत्तराखंडमध्ये जसे सोनोग्राफी यंत्रांना ‘अॅक्टीव्ह ट्रॅकर्स’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर राज्यात सर्व ठिकाणी ‘अॅक्टीव्ह ट्रॅकर्स’ अनिवार्य करण्याची आवश्यकता आहे़ स्त्री-भ्रूणहत्या रोखणे हा पक्षाचा किंवा अभियानाचा उपक्रम नसून समाजाचे काम आहे. त्यासाठी लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कन्या-जन्मोत्सवाचा उपक्रम स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्त्रीशिक्षणावर परिसंवाद, निबंध, रांगोळी स्पर्धा सामाजिक संस्थासह गणेशोत्सवात देखावे केले जातात़ मनपाच्या आरोग्य विभागाकडून देखील कन्या पूजन, कन्या सन्मान असे विविध उपक्रम राबविले जातात़ त्यामुळे स्त्रीभु्रण हत्या थांबविण्यात यश मिळवता आले आहे़ अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ मधुकर पवार यांनी दिली़एकूण
मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्म दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:57 PM