लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गोर-गरीबांच्या तोंडाचा घास हिरावून नेणाºया, रेशनच्या मालाचा काळाबाजार करणाºया रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करावा़ त्याचे दुकान बंद करावे अशी मागणी साक्री तालुक्यातील नांदवण येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार तथा प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी विनोद ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. साक्री तालुक्यातील नांदवण गावात गरीबांसाठी असलेले तांदूळ, गहू, साखर आणि अन्य साहित्य प्रशासनाकडून अद्यापपावेतो मिळालेला नाही़ गावकºयांचे रेशन कार्ड हे रेशनदुकानदाराकडे जमा करुन ठेवलेले आहेत़ असा आरोप साक्री पोलीस स्टेशनमध्ये नांदवण गावातील महिलांनी सोमवारी रात्री केला होता़ रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी गावातील शेकडो महिला-पुरुषांनी सोमवारी रात्री साक्री पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले होते़ यावेळेस तहसील कार्यालयातील अधिकारी आल्याशिवाय आम्ही कारवाई करु शकत नाही, असे पोलिसांनी ग्रामस्थांना सांगितले आणि ग्रामस्थांना सकाळी येण्याचा सल्ला पोलिसांनी दिल्यामुळे ग्रामस्थ निघून गेले होते़ मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी नायब तहसीलदार ठाकूर यांना निवेदन सादर केले़ रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती़ यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल देसले, वसंत साळुंखे, नितीन देवरे, किरण माळीच, किशोर शिंदे, आप्पा माळीच, विलास माळीच, जिभाऊ सोनवणे, सुभाष माळीच, मोहन टेळे, शांताराम पवार, पोपट माळीच, आबाजी साळुंके, सुरेश ठाकरे, नंदलाल पगारे, सुदाम माळीच, छोटू अहिरे, लक्ष्मण अहिरे, राजाराम शिंदे, सुनील ठाकरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़
साक्रीत रेशनदुकानदारावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:31 PM
काळा बाजार : नांदवण ग्रामस्थांची मागणी
ठळक मुद्देकाळ्या बाजारात जाणारा रेशनचा माल नांदवण ग्रामस्थांनी पकडलातहसील प्रशासनाला ग्रामस्थांनी दिले निवेदन