धुळे : पोलिसांवर दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आह़े त्यात महिला पोलिसांचाही समावेश आह़े घटकाभर विश्रांती घेता यावी यासाठी शहर पोलीस व शहर वाहतूक पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह बांधण्यास मंजूर मिळाली असून शहर वाहतूक शाखेच्या मागील बाजुला त्याचे कामालाही सुरुवात झाली आह़े त्यामुळे महिला पोलीस कर्मचा:यांमधून समाधान व्यक्त होत आह़ेशहर वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाण्यात प्रत्येकी सहा-सहा महिला पोलीस कार्यरत आहेत़ सध्या त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात विश्रामगृह व प्रसाधनगृह उपलब्ध करून देण्यात आले आह़े मात्र कायम स्वरूपी महिला पोलीस कर्मचा:यांना विश्रामगृह व प्रसाधनगृह बांधणे गरजेचे असल्यामुळे पोलीस दलाच्या आधुनिकीकरण योजना 2014-15 या वार्षिक कृती आराखडय़ास प्रशासकीय मान्यता व 14 लाख 38 हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आह़े हा निधी कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून त्याचा बांधकामाचा ठेकाही मंजूर झालेला असून पोलीस अधीक्षक चैतन्या एस यांनी गेल्या महिन्यात बांधकाम विभागाला तत्काळ काम सुरू करण्याबाबत पत्र दिले होत़े त्यानुसार काही दिवसांपासून शहर वाहतूक शाखेच्या मागील मोकळ्या जागेत महिला कर्मचा:यांसाठी विश्रांतीगृहाचे काम सुरू झालेले आह़े सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात येत पायाचे काम झाले असून पीलरही टाकण्यात आले आह़े दरम्यान विश्रांतीगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर महिला पोलिसांना घटकाभर विश्रांती घेऊन कामाचा ताण हलका करण्यास मदत होण्यास मदत होणार आह़े पोलीस चौकीचेही काम प्रगतीपथावर4पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दोन्ही मुख्य प्रवेशव्दारावर एक- एक कर्मचा:यांची नियमीतपणे नियुक्ती करण्यात आली आह़े मात्र त्यांना बाहेर बसावे लागत़े त्यामुळे त्यांना दिवसभर त्रास सहन करावा लागतो़ त्यांना डय़ुटीसाठी चौकी उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 3 लाख रूपये खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली आह़े त्यानुसार चौकीच्या कामाला सुरूवात झालेली असून काम प्रगतीपथावर आह़े दोन्ही गेटवर पोलीस चौकी उभारण्यात येत आह़े
महिला पोलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह
By admin | Published: February 20, 2017 12:55 AM