धुळे : शहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी प्रत्येक घरात जावून पाण्यांच्या साठ्यांंची तपासणी करून अॅबेटिंग, धुरळणी तसचे फवारणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़शहरात दोन दिवसांपूर्वी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे गटारी व नाले ओसंडले होते. मध्यरात्री पाऊस थांबल्यानंतर नाले, गटारींचे पाणी ओसरले असले तरी त्यातील कचरा रस्त्यावर आला आहे. शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. नाल्यालगत परिसरांमध्ये घाणीचे साम्राज्य झाल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढून साथींच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून मनपाकडून उपाययोजना सुरू केल्या आहेत. मलेरिया, स्वच्छता तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून देवपूरात सुभाष नगर परिसर, अग्रवाल नगर, वल्लभ नगर, मिलपरिसरातील काही भागात फवारणी करण्यात आली आहे़
डासांचा प्रादुर्भाव; प्रभागांमध्ये धुरळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:16 PM