धुळे : प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देवून पदवीधर शिक्षकांचे रिक्त पदे भरावीत, पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधुन केंद्रप्रमुखांची पदे भरावे यासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते तत्काळ सोडविण्यात यावे अशी मागणी जिल्हा समन्वय समितीने तक्रार निवारण सभेत केली. दरम्यान मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाºयांना सप्टेंबरपर्यंत पदोन्नती दिली जाईल असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी दिले. प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची तक्रार निवारण सभा उपमुख्य र्कायकारी अधिकारी ए.जे. तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार उपस्थित होते.जिल्हा प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देऊन पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, पदोन्नतीने मुख्याध्यापकांची पदे भरण्यात यावीत, पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची पदे भरावीत, उर्दू प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देऊन पदोन्नती मुख्याध्यापकाची पदे भरावीत,वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून वेतन श्रेणी लावावी, प्राथमिक शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतमार्फत भरण्यात यावे, शालेय पोषण आहाराचा तांदुळ व इतर धान्य मागणीप्रमाणे त्या-त्या महिन्यात पाच तारखेपर्यंत मिळावे अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता फंडात लवकरात लवकर जमा करावा, वैद्यकीय बिले विनाविलंब मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. दरम्यान मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाºयांना सप्टेंबरमध्ये पदोन्नती दिली जाईल, विस्थापित शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील असे आश्वासन दिले.प्रास्ताविक सरचिटणीस किशोर पाटील यांनी तर आभार प्रविण भदाणे मानले.सभेस समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे, सरचिटणीस किशोर पाटील सदस्य रविंद्र खैरनार, गमण पाटील, भगवंत बोरसे, नविनचंद्र भदाणे, शरद सूर्यवंशी, उमराव बोरसे, राजेंद्र नांद्रे, हारुण अन्सारी, अनिल तोरवणे, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, चंद्रकांत सत्तेसा, प्रविण भदाणे, नानासाहेब बोरस, सुरेंद्र पिंपळे, भुपेश वाघ, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर बाविस्कर,दत्तात्रय पाटील, रवींद्र सोळंके, नगराम जाधव,रुपेश जैन, रविंद्र पाटील, रियाज अन्सारी, अकिल अन्सारी, सुधीर पाटील, धिरज परदेशी आदी उपस्थित होते.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 9:35 PM