लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जानेवारीचे वेतन आॅफलाईन पद्धतीने वितरीत करण्याचे आदेश महाराष्टÑ शासनाच्या उपसचिव चारूशिला चौधरी यांनी दिले १ फेब्रुवारी रोजी पारीत केले आहे. त्यामुळे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेलाच व्हावे, यासाठी शासनाने शालार्थ वेतन प्रणाली सुरु केली. मात्र या प्रणालीनुसार दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे पगार कधीच होत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांमध्ये अगोदरच नाराजी त्यातच शालार्थ वेतन प्रणाली गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याने, शिक्षकांची वेतन देयके तयार होऊ शकली नव्हती. त्यामुळे शिक्षकांचे जानेवारी २०१८ या महिन्याचे वेतन रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.दरम्यान याबाबत शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्रालयात शिक्षणमंत्री, सचिव यांच्याशी , आयुक्त यांच्याशी चर्चा केली. शालार्थ वेतन प्रणालीची सेवा तात्काळ सुरु करण्यात यावी अथवा या शालार्थ वेतन प्रणाली मध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास ती दुरुस्त होईपर्यंत शिक्षकांची, कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्विकारण्यात यावी असा आग्रह धरला. वित्त विभागाची मंजुरी घेऊन शासनाच्या उपसचिव चारूशिला चौधरी यांनी १ फेब्रुवारी २०१८ रोजी एक पत्र काढून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे जानेवारी २०१८चे वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची जानेवारी १८ची वेतन देयके तात्काळ वेतन पथक विभागात सादर करावीत असे आवाहन शिक्षक परिषद धुळेचे मार्गदर्शक मदनलाल मिश्रा , अध्यक्ष भरतसिंह भदोरिया, कार्यवाह महेश मुळे, यांनी कळविले आहे. शिक्षकांना दिलासाशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ११०३ शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:08 PM
दिलासा: धुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या प्रयत्नांना यश
ठळक मुद्देशालार्थ प्रणाली बंदमुळे वेतनाची आली होती अडचणशिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चाजानेवारीचे वेतन आॅफलाईन करण्याच्या सूचना