लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोळी समाजातर्फे रविवारी दादासाहेब रावल स्टेडियमवर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील ९० उपवर तरुण-तरुणींनी परिचय करुन दिला. मेळाव्यास राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यांमधूनही उपवर उपस्थित होते.अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज शाखा धुळे व नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सातवा वर -वधु पालक परिचय मेळावा घेण्यात आला.अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा अ.भा. कोळी समाज प्रदेशाध्यक्ष कांतिजी कोळी होते. मेळाव्याचे उद्घाटन अ.भा. कोळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार सत्यनारायण पवार यांच्याहस्ते झाले.व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, मेळावा समिती अध्यक्ष मनोज निकम, पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे, नगरसेवक नरेंद्र कोळी, सत्यनारायण पवार, पोपटराव अंतुर्लीकर, रमेश निकम, सुरेश कुवर, प्रवीण देवरे, जयेंद्र सूर्यवंशी, सुशिल नवसारे, शिवदास चित्ते, अरविंद बागुल, प्रकाश सोनवणे, शरद तवर, दिलीप सोनवणे, भानुदास कोळी, संजय ईशी, सुनील कच्छवा, संतोष जाधव आदी उपस्थित होते.याप्रसंगी सत्यनारायण पवार म्हणाले, परिचय मेळाव्यामुळे वधु- वर शोधण्यासाठी लागणारा खर्च वाचून यामुळे काही लग्नही जुळतील. समाजाचे संघटन महत्वाचे आहे, विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी होण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणून कोळी समाजाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मनोज निकम म्हणाले, मेळाव्यासाठी महाराष्टÑासह परराज्यातून ६०० उपवर -वधुंची नोंदणी झाली आहे. मेळाव्यात ९० उपवर तरुण तरुणींनी परिचय करुन दिला. त्यात बहुसंख्य पदवीधर आहेत. मेळाव्यात प्रथम पुनम विश्वास निकम या युवतीने परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोळी समाज जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, सूत्रसंचलन रमेश निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज निकम, जयेश सूर्यवंशी, प्रदीप नवसारे, मनोज सोनवणे, कैलास ईशी, रविंद्र ईशी, सुरेश कुवर, प्रकाश सोनवणे, दिनेश चव्हाण, राजेंद्र ठाकरे, संजय ईशी आदींनी प्रयत्न केले.
९० उपवरांनी दिला परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:20 AM