कुसुंबा : धुळे येथील भरारी पथकाने कुसुंबा- कावठी रस्त्यावर ६ रोजी पांझरा नदीमधून अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली. या दोन्ही वाहनांमध्ये सुमारे २ ब्रास वाळू आढळून आली.धुळे येथील भरारी पथकाने ६ रोजी कुसुंबा-कावठी रस्त्यावर पांझरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहून नेणाºया दोन डंपरला पकडले. या डंपर चालकांकडे वाळू वाहतुकीबाबत कोणत्याही प्रकारचा वाहतूक पास अथवा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे एम.एच.२८ ए.बी. ९५७ क्रमांकाच्या डंपरचा चालक आबा काशीनाथ ठाकरे, रा.कुंडाणे (वार) व एम.एच.२१ एक्स ९९५३ क्रमांकाच्या डंपरचा चालक योगेश पाटील रा.नकाणे यांच्यासह चालक-मालकांवर कारवाई करण्यात आली.धुळे येथील नायब तहसिलदार एम.एन. ठोसर, कुसुंबा मंडळ अधिकारी के.बी. कांबळे, कुसूंबा तलाठी एस.जी. सूर्यवंशी, लिपिक दीपक महाले, लिपिक योगेश जिरे, पोलिस पाटील आकाश भदाणे, जगदीश माळी, दिनेश रायते, जयेश रायते, शरद घरटे, योगेश गवळी व मयूर नवरे आदींनी पंचनामा करून कार्यवाही केली.
अवैध वाळू तस्करीला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 11:16 PM