आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. यात काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून बदल्या करून घेतल्या. चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये विस्थापित व अन्याय झालेल्या शिक्षकांसंदर्भात महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेतर्फे मंगळवारी सायंकाळी कल्याण भवनात धुळे विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.जिल्हा परिषद शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. त्यात काही शिक्षक विस्थापित झाले. तर काहींवर अन्याय झालेला आहे. बैठकीत आॅनलाइन बदली संदर्भातील २७/२ च्या बदली निर्णयातील सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली.बदलीसाठी काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे. त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यात दोषी असलेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार सर्वात अवघड व पुढील पाच वर्षे बदलीपासून अपात्र करण्याचे शासनाचे आदेश असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.बदलीमध्ये जे शिक्षक विस्थापित झालेले आहेत, त्यांना समुपदेशन शिबिरात प्राधान्य देण्यात यावे जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त असून, त्या विस्थापित शिक्षकांना उपलब्ध करून द्याव्यात असे मत मांडण्यात आले.अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा दिलासा यावेळी राजेंद्र नांद्रे यांनी दिला. बैठकीस किशोर पाटील, रूपेश जैन, योगेंद्र झाल्टे, रामभाऊ पाटील, साधना खैरनार, शरद ठाकरे, सोनल शहा, रंजीत लांडगे, विक्रम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, यांच्यासह जवळपास ७५ शिक्षक उपस्थित होते.
चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:45 AM
महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीत मागणी
ठळक मुद्देजिल्ह्यात नुकत्याच ३५० शिक्षकांच्या झाल्या बदल्याबदल्यांमध्ये अनेकांवर अन्याय झाल्याची तक्रार