लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आयपीएल मॅचवर शिरपूर येथे बेकायदेशीर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री धाड टाकली़ याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली़ या कारवाईत ३६ हजार ८३० रुपये रोखसह मोबाईल व अन्य साधने जप्त करण्यात आली आहेत़ सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे सट्टा खेळविला जात असल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने शिरपूरात धाड टाकली़ आयपीएल क्रिकेट सरराईजर्स हैदराबाद विरुध्द केकेआर कलकत्ता या मॅचवर संशयित सचिन दगडूलाल जैन (३२, रा़ मोतीलाल नगर, रिक्रीयेशन नगर शिरपूर) याने मोबाईलमध्ये क्रिकेट लाईव्ह लाईन हे अॅप बेकायदेशीरपणे डाऊनलोड करुन ग्राहकांकडून पैसे स्विकारुन सट्टा खेळताना व खेळविताना आढळून आला़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली आणि सहा जणांना ताब्यात घेतले़ यात सचिन दगडूलाल जैन (३२, रा़ मोतीलाल नगर, रिक्रीयेशन नगर शिरपूर) याच्यासह राहुल वेलपांडे, राहुल ठाकरे, संकेत दगडूलाल जैन, पराग जयकुमार जैन, अनुराग जयकुमार जैन या संशयितांविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायदा २००० व माहिती तंत्रज्ञान कायदा दुरुस्ती २००८ चे कलम ६५, ७२ (अ), ८४ (ब) व महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत़
आयपीएल मॅचवर शिरपूर येथे सट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:31 PM
एलसीबीची धाड : ६ जणांना अटक
ठळक मुद्देशिरपूर येथे कारवाईएलसीबीची अचानक धाडमुद्देमालासह ६ जणांना अटक