शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती नसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:48 AM

महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेना : तहसीलदार गणेश ठाकूर यांना दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील काही शाळा विद्यार्थ्यांना ठराविक दुकानातूनच शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदीची सक्ती करीत आहेत. शैक्षणिक वस्तू खरेदीसाठी पालकांना ठराविक दुकानांची सक्ती करू नये अशा मागणीचे निवेदन महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज धुळे तहसीलदार गणेश ठाकूर यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असून, काही शाळा ठराविक दुकानातूनच गणवेश व इतर वस्तू खरेदी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.अनेक विद्यालयांमध्ये पूर्व परवानगी न घेता तात्पुरते स्टॉल लावून पुस्तक व शालेय साहित्याची विक्री केली जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.पालकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने २ मे १६ रोजी परिपत्रक काढून शालेय गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य हे शाळेतून अथवा ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती करू नये असे आदेश दिलेले आहेत. असे असतांनाही काही शाळांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातून खरेदीची सक्ती करू नये असे आदेश द्यावेत अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद देशमुख,हर्षल परदेशी, गौरव गीते, यश शर्मा, गुरूराज पाटील, राहूल मराठे, विठ्ंल पगारे, तुषार हरणे, समाधान पाटील, देविदास चौधरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण