धुळे : जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू आहे. परंतु, निसर्गावर अवलंबून असलेला आपला शेतकरी राजाला देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते आजतागायत जे हवे होते ते मिळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाºया ‘न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिद्धी’ या उपक्रमांतर्गत येत्या पाच वर्षात सुराज्य आणायचे आहे. सुराज्य आणेपर्यंत आता आम्ही गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागातर्फे शनिवारी सकाळी कृषी महाविद्यालयातील सभागृहात ‘न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिद्धी’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे आदी उपस्थित होते. ६० हजार कोटी रुपये गेले पाण्यात!आघाडी सरकारच्या काळात ६० हजार कोटी रुपये सिंचनासाठी वापरले गेल्याचा गवगवा करण्यात आला. येवढे पैसे वापरले गेले असताना आज महाराष्टÑ राज्याचा विचार केला तर राज्यात ओलीताखाली असलेली जमिन केवळ १० टक्के इतकीच आहे. त्यातुलनेत हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गुजरात ही राज्ये आपल्या राज्यापेक्षा पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक योजना राबविण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने संपूर्ण देशभरात काम सुरू आहे, असे मंत्री डॉ. भामरे म्हणाले. धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न सुटणारपंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्यातील बंद पडलेल्या २९ उपसा सिंचन योजनांचे पुनरूजीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आपल्या जिल्ह्यात तापी नदीवर असलेल्या सुलवाडे- जामफळ-कनोली या प्रकल्पाचाही समावेश असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २३६० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण झाल्यानंतर खºया अर्थाने धुळे व शिंदखेडा तालुक्यातील अनुक्र मे ५० गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचे मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले. धुळ्यात कोल्ड स्टोरेज आणणार!शेतकºयांनी उत्पादीत केलेला नाशवंत माल खराब होऊ नये, यादृष्टीने लवकरच धुळ्यात कोल्ड स्टोरेज आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. ही बंदी उठल्यामुळे आता शेतकºयांना त्यांचा घामाचा योग्य तो मोबदला मिळत असल्याचे डॉ.भामरे यांनी येथे स्पष्ट केले. ‘मोबाईल इरिगेशन’ संकल्पना शेतकºयांसाठी उपयुक्त पाऊस बेभरवशाचा झाला आहे. त्यात २०२२ पर्यंत चिंतारहित शेतकरी करण्याचे आवाहन सिद्धीस न्यायचे आहे. त्यासाठी ज्या भागात पाऊस पडतच नाही, त्या भागात ‘मोबाईल इरिगेशन’ ही संकल्पना राबविली गेली तर तेथील शेतकºयांना निश्चितच फायदा होणार आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. किरण कोकाटे यांनी व्यक्त केले.
पाच वर्षात सुराज्य आणल्याशिवाय गप्प बसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:43 PM
‘न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिद्धी’ उप्रकम : मंत्री सुभाष भामरे यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागातर्फे कार्यक्रम
ठळक मुद्देधुळे जिल्हा डिसेंबर २०१७ पर्यंत हागणदारीमुक्तचे लक्ष जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, की जोपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होत नाही. तोपर्यंत आपली झालेली प्रगती व्यर्थ आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून येत्या डिसेंबर २०१७ पर्यंत धुळे उल्लेखनीय काम करणाºया शेतकºयांचा सत्कार जिल्ह्यात उल्लेखनीय काम करणारे दिलीप पाटील (वडणे, ता. धुळे), संदीप भामरे (काळगाव, ता. साक्री), तवरसिंग राजपूत (अजनाड, ता. धुळे), निमेश महाजन (पाडळदे, ता. धुळे), समाधान बागुल (अंतुर्ली, शिरपूर), प्रकाश पाटील (पडावद१५ लाभार्थ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर वाटप कार्यक्रमात कल्पना जाधव (अंचाळेतांडा), आनंदा गवळी (जुन्नेर), सुरूबाई गोयकर (भदाणे), इंदिरा चौधरी (वरखेडे), हिरकणीबाई मराठे (बाबरे), दीपाली गुजर, राजेश गुजर, सुनंदा खैरनार (मोहाडी प्र. डांगरी), देवीदास पाटील (विश्‘न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिद्धी’ उपक्रम म्हणजे काय? कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. यशवंत फुलपगारे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करून २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पादन वाढावे, हा उद्देश या म