धुळे : वाहन चालकांच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नो पार्कीग अस्ताव्यस्त वाहनांना आता जॅमर बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी १२ जॅमर खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे़मनपा आयुक्तांच्या दालनात बुधवारी शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अतिक्रमण मोहिम राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली़ बैठकीला आयुक्त अजिज शेख, पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, उपायुक्त गणेश गिरी, पल्लवी शिरसाठ, प्रसाद जाधव उपस्थित होते़ शहरातील रस्त्यावर केलेले अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक, मिळेल त्या जागेवर अस्ताव्यस्त पद्धतीने वाहन पार्कीग करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी गुरुवारपासून वाहतूक पोलीस व मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून संयुक्त मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
त्या वाहनांना पोलिस लावणार ‘जॅमर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:24 PM