लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्य नगरोत्थान योजनेत प्रस्तावित व सध्या प्रगतिपथावर असलेल्या रस्त्यावरील दोन घरांचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले़ साक्री रोडवरील सिंचन भवनाशेजारी असलेल्या रस्त्यावरील घरांवर ही कारवाई झाली़सदर घरे आेंकार केशव पवार आणि राजू गेंदा मोरे यांची होती़ ते अनेक वर्षांपासून त्याठिकाणी राहत होते़ त्यामुळे अतिक्रमण निघू नये यासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता़ परंतु गेल्या महिन्यात न्यायालयाने संबंधितांचा दावा फेटाळून लावला़ त्यानंतर मनपाने त्यांना नोटीस दिली होती़ त्यानुसार शुक्रवारी मनपातर्फे पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली़ राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत सिंचन भवन ते महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे़ त्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली़ अभियंता कैलास शिंदे, कमलेश सोनवणे, सुनंद भामरे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली़ तत्पूर्वी घरातील साहित्य बाजूला काढून ठेवण्यात आले़ सदरचे घर मनपाच्याच एका कर्मचाºयाचे होते, अशी चर्चा होती़ मात्र त्यास अधिकृत दुजोरा मनपातर्फे देण्यात आला नाही़
सिंचन भवन परिसरात दोन घरांवर ‘जेसीबी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:30 AM
मनपाची कारवाई : राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत प्रस्तावित रस्त्यास अडथळा
ठळक मुद्देसाक्री रोडवर कारवाई सिंचन भवनाशेजारील दोन घरे जमीनदोस्त