लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील एल्लम्मा माता मंदिरात सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ८० ते ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली़ सकाळी ही बाब लक्षात आली़ पोलिसांसह श्वानपथक दाखल झाले होते़ थोड्याअंतरापर्यंत श्वानाने मार्ग दाखविला़ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़ शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौक ते दसेरा मैदानादरम्यान एल्लम्मा देवी मंदिर आहे़ मंदिरात सध्या फर्निचर तयार करण्याचे काम सुरु आहे़ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाकडी टेबल लावण्यात आले होते़ चोरट्याने त्याचा फायदा घेत मंदिरात सहजपणे प्रवेश केला़ चोरट्याने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात ते कैद झाले आहे़ चोरीची ही घटना पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे़ चाळीसगाव रोड पोलिसांना ही घटना कळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पथकासह दाखल झाले़ त्यासोबत श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वानाने अग्रवाल नगर, आदिवासी कार्यालयजवळील चार रस्तापर्यंत माग दाखविला़ पुढील तपास सुरु आहे़
धुळ्यातील एल्लम्मा देवी मंदिरातून दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:31 AM
मालेगाव रोड : पहाटे घटना, पोलिसांसह श्वान पथकही दाखल
ठळक मुद्देमालेगाव रोडवरील एल्लम्मा देवी मंदिरात चोरीसोन्या, चांदीचे दागिन्यासह रोकडही लंपासपोलिसांसह श्वान पथकालाही पाचारण