लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : बनावट चाबी बनवून देण्याचा बहाणा करुन कपाटातील दागिने लांबवून पोबारा करणारा प्रविणसिंग जीवनसिंग खबीर (१७, रा़ उमरटी ता़ वरला जि़ बडवाणी, मध्यप्रदेश) याला गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही फुटेज, किरकोळ विक्रेत्यांसह मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेऊन जेरबंद केले़ ही कारवाई शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात केले़१७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास न्यू बोराडी गावातील राहत्या घरी शिकाऱ्या पावरा यांनी घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरची चावी बनविण्यासाठी एका १६ ते १९ वयोगटातील अनोळखी तरुणाला बोलाविले होते़ त्या तरुणाने चाबी बनवित असताना शिकाºया पावरा यांना त्याचा भाऊ येत असल्याचे सांगून त्याला बघा असे म्हणत घराबाहेर पाठविले़ त्यानंतर शिताफिने नजर चुकवून लॉकरमध्ये ठेवलेले चांदीचे ४९ हजार ४०० रुपयांचे दागिने, २५ हजाराचे पांढºया धातूचे दागिने असा एकूण ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला़ लॉकरच्या लॉकमध्ये कापसाच्या तेलाचा बोळा अटकवून दिला़ लॉक उघडत नसल्याचे सांगत मी दुसरी चाबी घेऊन येतो असे म्हणून तो निघून गेला़ मात्र तो बºयाच वेळ होऊनही आलाच नाही़ अखेर काही दिवस वाट पाहिल्यावर अखेर पावरा यांनी लॉकरचे लॉक तोडून ते उघडले़ तेव्हा दागिने चोरण्यात आल्याचे आढळून आले़
दागिने लांबविणारा २४ तासात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 7:41 PM