आॅनलाईन लोकमतधुळे : पाच वर्षापूर्वी बांधकाम विभागाच्या अभियंत्याला लाच घेतांना पकडण्यात आले होते. त्या प्रकरणाचा चौकशी अहवाल अभियंत्याच्या बाजुने पाठविण्यासाठी २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी मंत्रालयातील सहसचिव प्रभाकर बाबुराव पवार (वय ४८, रा. विजयनगर, कल्याणपूर्व) यांना त्यांच्या नातेवाईकासह बुधवारी अटक करण्यात आल्याची माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत शत्रुघ्न माळी यांनी सांगितले की, तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावर कार्यरत होते. त्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना रंगेहात पकडले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांची महाराष्टÑ शासनामार्फत उच्चस्तरावर विभागीय चौकशी सुरू होती. ही चौकशी मंत्रालयातील वर्ग-१चे अधिकारी सहसचिव व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी प्रभाकर बाबुराव पवार यांच्या मार्फत सुरू होती.चौकशी सुरू असतांना पवार यांनी तुमच्या बाजुने महाराष्टÑ शासनास चौकशी अहवाल पाठविला असून, त्याबद्दल तक्रारदाराकडे ४० हजार रूपयांची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने ७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे पवार यांच्याविरूद्ध तक्रार नोंदविली.तडजोडीअंती पवार यांनी आपले नातेवाईक प्रशांत गवळी (२७, रा. राजपूत कॉलनी, देवपूर,धुळे) याच्याकडे २५ हजार रूपये देण्यास तक्रारदारास सांगितले.त्यानुसार बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता तक्रारदाराकडून २५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना प्रशांत गवळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गणपती मंदिराजवळ रंगेहात पकडले.त्यानंतर प्रभाकर पवार हे नाशिक येथून त्यांच्या राहत्या घरी ठाणेपाडा (जि. नंदुरबार) येथे जात असतांना मध्यरात्री त्यांना पकडले. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे आणण्यात आले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभाकर पवार व प्रशांत गवळी यांना अटक करण्यात आली आहे.प्रभाकर पवार राजपत्रित अधिकारीप्रभाकर पवार हे १९९६ च्या राज्यसेवा बॅचचे अधिकारी असून, ते महाराष्टÑ मंत्रालयीन राजपत्रित अधिकारी आहे. शासनाने त्यांची अॅन्टी करप्शन ब्युरोने भ्रष्ट अधिकाºयांविरूद्ध लाच घेतांना झालेल्या कार्यवाहीबाबतची विभागीय चौकशी करण्यासाठी खास नियुक्ती केली होती. परंतु अशा राजपत्रित अधिकाºयानेच चौकशी सुरू असलेल्या अधिकाºयाकडे लाचेची मागणी करून, त्याच्याबाजुने शासनाला दिशाभूल करणारा अहवाल पाठविला. या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.
लाचप्रकरणी मंत्रालयातील सहसचिव प्रभाकर पवार यांना नातेवाईकासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:43 PM
धुळे लाचलुचपत विभाागाची कारवाई : २५ हजाराची लाच घेतली
ठळक मुद्देतक्रारदाराच्या बाजुने चौकशी अहवाला पाठविण्यासाठी ४० हजाराची मागणीतडजोडीअंती २५ हजार रूपये देण्याचे ठरले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून नातेवाईकास पकडले