ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.22 - रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्डय़ा याच्या खून प्रकरणातील संशयित सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी (25) याला पुण्यातून मोठय़ा शिताफिने ताब्यात घेण्यात विशेष पथकाला यश आले आह़े अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल़े
मंगळवार 18 जुलै रोजी पहाटे गुड्ड्याचा खून झाला़ यात बंदुकीसह तलवार आणि धारदार शस्त्राचा वापर झाला होता़ ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर संशयितांची नावे जाहीर करण्यात आली़ त्यांची नावे सांगणा:यांना पोलीस प्रशासनाकडून बक्षिस देखील जाहीर करण्यात आल़े याकामी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांना मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आदी ठिकाणी आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आले होत़े
कामशेत येथून ताब्यात
पुणे येथील कामशेत या ठिकाणी आरोपी असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि मोठय़ा शिताफिने संशयित सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी याच्या मुसक्या आवळल्या़ त्याला लागलीच धुळ्यात आणण्यात आल़े त्याची आता चौकशी केली जाणार असून अन्य आरोपींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल़
मदत केल्यास कारवाई
गुड्डय़ा खून प्रकरणातील एका संशयिताला अटक केल्यानंतर लवकरच अन्य आरोपींनाही ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी व्यक्त केला आह़े या घटनेतील फरार आरोपींचा देखील आता शोध घेतला जाईल़ त्यांना कोणीही मदत करु नये, केल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशिर कारवाई केली जाईल, असेही संकेत देण्यात आल़े
बाहेरील पोलिसांची मदत
गुड्डय़ा खून प्रकरणानंतर आरोपी फरार असले तरी धुळे पोलीस त्यांचा शोध घेत आह़े याकामी जिल्ह्यातील पोलिसांसह संपूर्ण राज्यातील पोलिसांची तपासकामी मदत घेतली जात आह़े सर्व पोलीस मदत करत आहेत, असेही पानसरे यांनी सांगितल़े
तडीपारांनाही पकडणार
विविध गुन्ह्यातील तडीपार झालेले आरोपी सर्रासपणे धुळ्यात फिरत असल्याचे समोर येत आह़े अशांना शोधून काढले जाईल़ त्यांच्यावर देखील कायदेशिर कारवाई केली जाणार असल्याचे पानसरे यांनी सांगितल़े
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडला कट्टी
पुण्यातील कामशेत या भागात शनिवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आल्यामुळे सकाळी 6 वाजताच कट्टी पोलिसांना सापडला़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राठोड, हवालदार कुणाल पानपाटील, रवी राठोड, दीपक पाटील, रमेश माळी या आझादनगरच्या विशेष पथकाने ही कामगिरी पार पाडली़