धुळे : वाचन संस्कृती टिकवुन वाचकांना वाचनाकडे प्रेरीत करण्यासाठी इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळासह धोंडो श्यामराव गरुड जिल्हा वाचनालयाने विविध भाषेतील जपलेला अनमोल गं्रथांचा प्रेरणादायी ठरत आहे़संशोधकांसाठी पर्वणीसंशोधन मंडळासोबतच इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालय १९२७ मध्ये सुरू केले. हे ग्रंथालय इतिहास व मराठीतील संशोधक आणि अभ्यासकांसाठी विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाले आहे. संशोधनाच्या निमित्ताने येणाºया देश-विदेशातील अभ्यासकांना या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचा अभ्यास करायला मिळतो.२५ हजारांवर ग्रंथसंपदाइतिहासाचार्य राजवाडे यांच्या निधनानंतर संशोधन मंडळ आकाराला आले. संशोधकांसोबत अभ्यासकांना या ग्रंथालयाचा उपयोग व्हावा हाच यामागे हेतू होता. सुरुवातीला अगदी दोन-अडीच हजार ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयात २५ हजारांपेक्षा अधिक ग्रंथ असून, ७५० पेक्षा अधिक सभासद नियमित त्याचा लाभ घेतात. शहरातील एकमेव मध्यवर्ती ठिकाणी हे ग्रंथालय असल्यामुळे येथे येणाºया वाचक, अभ्यासक आणि संशोधकांची नेहमीच वर्दळ असते.मराठीचा खजिनाग्रंथालय पुरातन असल्याने त्यात दुर्मिळ अमूल्य असे ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. त्यासोबत कथा, कादंब-या, ललित, चरित्र, धार्मिक,ज्योतिष, पर्यावरण, संदर्भ, शिक्षण अशा नानाविध ग्रंथांचे संग्रह केले आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेचेही ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाकडून प्राप्त ग्रंथांचाही समावेश आहे.गरूड वाचनालयाचा उपक्रमगरुड जिल्हा वाचनालयात ऐंशी हजारावर दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत़ नियमित सदस्यांना २ पुस्तकावर बालवाग्मयाची दोन पुस्तके मोफत वर्गणीदारांना दिली जात आहे़ त्यामुळे पुढंच्या पिढीतील शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
वाचन संस्कृतीचा ठेवा:राजवाडे,गरूड वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:37 PM