धुळे - आठे जमेल खानदेशना तमाम भाऊ- बहिनीसले मना मन:पूर्वक नमस्कार. तुमी इतला लोके, माले आशीर्वाद देवाले उनात. मी तुमना आभारी शे. खानदेशना लोकेसना जीव्हाळाना प्रकल्प मा मी सहभागी व्हयनू येना माले आनंद शे, अशा शब्दात अहिराणी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धुळेकरांचे मने जिंकली.शहरातील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शनिवारी सभा झाली़कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १२० वर्षापूर्वी धुळे - चाळीसगाव रेल्वे सुरु झाली होती. त्यानंतर आता धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे. तसेच सुलवाडे - जामफळ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या प्रकल्पामुळे शिंदखेडा व धुळे तालुक्यातील २०० गावांचा फायदा मिळणार असून यामुळे धुळे जिल्हा नंदनवन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी भरघोस निधी मिळवून दिला. हा सिंचन प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षितसभेत पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशासह महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री सिंचाई कृषी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत देशभरातील ९९ प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे तीन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.स्वातंत्र्य सैनिकरामेश्वर पोद्दारांची आठवणसभा ज्याठिकाणी झाली ती १४ एकर जमिनी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वर पोद्दार यांनी गो रक्षण व पालनासाठी दान केली होती. त्यांचे काम प्रेरणादायी आहे. त्यापासून प्रेरणा घेऊनच केंद्र शासनाने पशु पालकांच्या मदतीसाठी कामधेनू आयोगाची स्थापना केली आहे. आयोग हा देशातील गो पशुपालकांना आर्थिक मदत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचेही पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले.केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर बी- बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करता येईल. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकºयांच्या खात्यावर साडेसात लाख कोटी रुपये खर्च केले जातील. त्यामुळे शेतकºयांना सावकाराकडे कर्ज मागण्यासाठी जावे लागणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
खानदेशना लोकेसना जिव्हाळाना प्रकल्प..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:07 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी : अहिराणी भाषेतून केली भाषणाला सुरूवात
ठळक मुद्देप्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जाणारस्वातंत्र्य सैनिक रामेश्वर पोद्दारांची आठवणपाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद