शिरपूर : २६७ वर्षाची यात्रोत्सावाची परंपरा असलेल्या महाराष्टÑाचे कुलदैवत व जागृत देवस्थान श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाची सुरूवात झाली. जय मल्हारचा जयघोष करीत भक्तीमय वातावरणात आबाल वृध्द भाविकांनी पहिल्या दिवशी दर्शनाचा लाभ घेतला. या यात्रेवर दुष्काळाचे सावट असल्यामुळे अनेक दुकानदारांनी पाठ फिरविल्याचे दिसते़ यावेळी उपस्थितांनी शहिद जवांनाना श्रध्दांजली वाहिली़१९ रोजी सकाळी खंडोबा महाराज यात्रोत्सवाची महाआरती आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आली़ यावेळी तहसिलदार चंद्रशेखर देशमुख, उद्योगपती तपनभाई पटेल, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, पोनि संजय सानप, भू-माता ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष तृप्ती देसाई, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, डॉ़जितेंद्र ठाकूर, नवनीत राखेचा, सेनेचे राजू टेलर, हिंमत महाजन, भरतसिंग राजपूत, नगरसेवक राजूअण्णा गिरासे, किरण दलाल, गुलाब भोई, साहेबराव महाजन, खंडेराव संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, गोपाल ठाकरे, श्रीहरी यादगीरीवार, गोपाल मारवाडी, अभिमन भोई, मोतीलाल शर्मा, महेश लोहार, विजय तिवारी, आबा धाकड, रामचंद्र ठाकरे, विनायक कोळी तसेच मंदिर संस्थानचे पदाधिकारी-विश्वस्त व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.पहाटेपासूनच मंदिरात जाणारे भाविक शांततेत श्री खंडोबा महाराजांचे जय घोष करीत दर्शन घेत होते. यात्रोत्सव महाआरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली़ तसेच नवस फेडणाऱ्यांनी सुध्दा गर्दी केली होती़नवसाला पावणारा देव म्हणून खंडेराव महाराज मानले जातात. येथील कालू बाबा खंडेरावांची निस्सीम सेवा पुजा अर्चा करुनही मूल बाळ नव्हते म्हणून व्यथित होते. खंडेरावाला स्वत:चे शिर अर्पण करण्याचा नवस त्यांनी करुन मूल होण्याचे साकळे घातले. त्यांनी शिर अर्पण केल्यावर रक्त न निघता भंडारा निघाला अशी अख्यायिका आहे. भाविकांचे तसेच नवस करुन देवाला साकळे घालून आपली मनोकामना पूर्तीसाठी यात्रेच्या काळात मान-मानता, नवस करणारे अनेक नव दाम्पंत्य व भाविक येत होते. प्रामुख्याने दिवस भरात ग्रामीण भागातील लोक यात्रेचे दर्शन घेत होते.रात्री विद्युत रोषणाईत शहरातील नागरिक यात्रेचा आनंद लुटत होते. श्री खंडोबा महाराज यात्रास्थळी व चौका-चौकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.युवक-युवतींसह बच्चे कंपनी पाळणे, झुल्यात बसण्याचा तर मौत का कुव्वा, मॅझिक शो पाहण्याचा आंनद घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली. शेवटी घरी परतांना हॉटेल व्यावसायिंकडे गुळाची जलेबी व भजी खाण्यासाठी अथवा घेण्यासाठी साºयांनी गर्दी केली. मंदिराच्या बाजूला २४ तास तात्पुरती पोलिस चौकी उभारली आहे. डीवायएसपी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय सानप यांच्यासह सपोनि, पीएसआय, शिंंदखेडा, नरडाणा, थाळनेर व शिरपूर ठाण्यातील पोलिस कर्मचारी यात्रा परिसरात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय साध्या डेÑसेसमध्ये फिरते पथक फिरत आहे.महिला पोलिस पथकही नजर ठेवून आहे. मंदिराकडे जाणाºया मार्गावर वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहे.
खंडोबा यात्रौत्सव प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:12 PM