धुळे : तालुक्यातील मोरदड येथे पुतळा विटंबना करणाºयांना कठोर शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर निरपराधांचा छळ थांबवावा. या प्रकरणातील खºया गुन्हेगारांचा शोध घ्यावा अशी मागणी मोरदड ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे आज केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही निषेधार्ह बाब आहे. मोरदड गावात काहीजण शांतता भंग करण्याचे काम करीत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोरदडच्या ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच आपले सविस्तर म्हणणे पोलीस अधिकाºयांसमोर मांडले. यावेळी गोविंदा पाटील, सुभाष दगा पाटील, कुलदीप पाटील, सागर पाटील, गोरखनाथ पाटील, पुष्पाबाई पाटील, एकनाथ पाटील, रावसाहेब पाटील, माधवराव पाटील, सुशिलाबाई पाटील, लाडकाबाई पाटील, विद्याबाई पाटील, विलास पाटील, महेंद्र पाटील, निर्मला पाटील, रमेश पाटील, आशाबाई पाटील, वाल्मीक पाटील, अनिल पाटील, यांच्यासह चारशेपेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्यासमवेत मराठा क्रांती मोर्चाचे निंबा मराठे, राजू महाराज, अर्जून पाटील हे देखील उपस्थित होते.
खया गुन्हेगारांचा शोध घेण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 9:36 PM