शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

लाखाचे ‘पाणी’ बाराच्या भावात़ !

By admin | Published: April 23, 2017 12:43 PM

शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े

ऑनलाईन लोकमत / देवेंद्र पाठक धुळे, दि. 23 - शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े बाभळे जलशुद्धीकरण केंद्र ते नगाव एमबीआर जलकुंभार्पयतच्या जलवाहिनीला 33 ठिकाणी गळती लागली आह़े त्यात काही भागात व्हॉल्व्ह गळती आह़े या सर्व माध्यमातून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आह़े शुक्रवारी ‘लोकमत’ने या जलवाहिनीची पाहणी केली़ 60 टक्के भागाला पुरवठातापी पाणीपुरवठा योजना 29 जुलै 1994 पासून कार्यान्वित झाली आह़े तेव्हापासून शहराच्या 60 टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आह़े मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आह़े आजच्या परिस्थितीत शहरात दररोज सुमारे 5 कोटी 50 लाख लीटर पाणी दाखल होत़े पैकी 1 कोटी 50 लाख लीटर पाणी वाया जात असून त्यापैकी 55 लाख लीटर पाणी केवळ गळतीच्या माध्यमातून वाया जात़े तापी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आह़ेपाच वर्षात कोटींवर खर्च दरवर्षी तापी जलवाहिनीला लागणा:या गळतीच्या दुरुस्तीवर सुमारे 10 लाख रुपये खर्च होतात़ गेल्या पाच वर्षात पाणी गळतीवर तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आह़े तापी नदीवरून शहराच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा होत असून जलवाहिनीची लांबी 40 कि.मी. आह़े सर्वाधिक गळती या जलवाहिनीला लागत असून या जलवाहिनीवरून सबलाईन 175 कि.मी. असल्याचे सांगण्यात आल़े तापी पाणीपुरवठा योजनेवरील गळतीमधून रोज लाखो लीटर पाणी वाया जात असून ठिकठिकाणी कारंजे उडताना दिसून आल़े, तर बहुतांश ठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचल्याचे चित्र स्पष्ट आह़े सरवडजवळ तर महिलांसाठी कपडे धुण्याचे मुख्य ठिकाणच झाले आह़े वाढत्या उन्हामुळे लहान मुले तर अंघोळीचा आनंद लुटत आहेत़ काही गळतींचा आधार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असून कापडणे, देवभाने येथील नागरिक कॅन, ड्रमचा आधार घेत पाणी घेऊन जातात़ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला वर्षभरात  ठिकठिकाणी गळती लागली़ योजना जुनी झाली असून त्यामुळे तिची पाईपलाईन जीर्ण झाल्याने वारंवार गळती लागते, असे मनपा अधिका:यांचे म्हणणे आहे.जीर्ण होतेय जलवाहिनी  1991मध्ये जलवाहिनी टाकल्यानंतर आज 2017 वर्ष सुरू होऊन अर्धे संपत आल़े पण या जलवाहिनीचे नूतनीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.त्यामुळे ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आह़े ही जलवाहिनी आता बदलण्याची आवश्यकता आह़े पण, महापालिकेचे उदासीन धोरण मात्र या कामाला कधी अनुमती देणार? हा प्रश्न आह़ेलाखो लीटर पाणी मातीमोलजलवाहिनीचे काम झाल्यापासून विचार केल्यास शेकडोवेळा जलवाहिनीला गळती लागली आह़े त्यातून लाखो लीटर पाणी मातीमोल झाले आह़े याशिवाय पाणीचोरीचे प्रमाणही दरम्यानच्या काळात वाढले होत़े यावर प्रतिबंध करण्यासाठी मनपाने उपाययोजनाही केली होती़ 10 लाखांची तरतूद तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीला खूपच खर्च लागतो़ दरवेळेस महापालिकेकडे पैसे असतातच, असे नाही़ नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही़ या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आर्थिक नियोजन करत दरवर्षाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद म्हणून या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 10 लाखांचा खर्च अपेक्षित धरला आह़े