आॅनलाइन लोकमतशिरपूर,जि.धुळे : तालुक्यातील मालकातर शिवारात एका घरात दडविलेला देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात येथील तालुका पोलिसांना यश आले. बुधवारी सकाळी झालेल्या या कारवाईप्रकरणी पोलिसांनी एकास अटक करून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत असून याबाबत गोपनीय माहिती काढण्यात येत आहे. त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस अधिकारी अभिषेक पाटील यांनी माहिती मिळाली की, मध्य प्रदेश राज्यातील पानसेमल परिसरातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा महाराष्टÑ राज्याच्या सीमेलगतच्या गावांमध्ये विक्रीच्या उद्देशाने दडविण्यासाठी पाठविला जात आहे.त्या अनुषंगाने अधिक माहिती काढली असता शिरपूर तालुका हद्दीतील सीमेलगतच्या मालकातर या गावात लुला कांजऱ्या पावरा (२५) रा.मालकातर, ता.शिरपूर याने त्याच्या घरामागे मध्य प्रदेशातून आलेला दारू साठा दडवून ठेवल्याची माहिती मिळाली. सपोनि पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण गवळी, प्रकाश मोरे, संजय माळी, संजीव जाधव, संतोष देवरे, योगेश दाभाडे, योगेश मोरे, राजीव गीते, अश्विनी चौधरी व सुनिता पवार यांना नियोजनबद्ध छापा टाकला. त्यात ३४ हजार रुपये किमतीच्या १८० मिलीच्या २४० बाटल्या व ३८ हजार रुपये किमतीच्या १८० मिलीच्या ७२० बाटल्या असा एकूण ७२ हजारांचा साठा जप्त केला. या प्रकरणी लुला पावरा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास प्रकाश मोरे करीत आहेत.
शिरपूर तालुक्यात देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 11:38 AM